School Students | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

बदलापूर मध्ये आदर्श विद्या मंदिर (Adarsh School Badlapur Sexual Abuse Case) मध्ये शिशू वर्गातील मुलींसोबत शाळेतच झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शाळेतही मुली सुरक्षित नसल्याने आता भीतीचं वातावरण असताना शिक्षण विभागाने मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही मोठे निर्णय घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच नवी नियमावली जारी केली आहे. त्यामुळे सीसीटीव्हीच्या सोबतीने मुली, महिलांच्या सोबतीला आता पॅनिक बटन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शाळा, कॉलेज मध्ये पॅनिक बटन बसवलं जाण्याचा मानस बोलून दाखवला आहे. नक्की वाचा: Adarsh School Badlapur Sexual Abuse Case: धक्कादायक! शाळेतील 15 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब, दिपक केसरकर यांचा शाळेच्या मॅनेजमेंटवर कारवाईचा इशारा .

पॅनिक बटन कसं करणार मदत?

पॅनिक बटन वर्गात किंवा महत्त्वाच्या ठिकाणी तर बसवलं जाईल पण त्यासोबतच मुलींजवळ देखील एखाद्या स्वरूपामध्ये पॅनिक बटन दिलं जाणार आहे. ज्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकांनाही तातडीने त्याच्या आवाजाने माहिती मिळणार आहे. वर्गात किंवा मुलींच्या हॉस्टेल मध्ये पॅनिक बटण बसवण्यामागे आता टेंडर काढण्याचं काम सुरू केले जाईल. अनेक फोन मध्ये आता ही सोय आहे.

बदलापूर प्रमाणेच राज्यात अनेक भागातून महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. यामध्ये आता मुलींना अत्याचाराविरूद्ध आवाज उठवण्यासाठी सबळ करण्याचे विविध उपाययोजना सुरू झाल्या आहेत. दरम्यान महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्यात 'शक्ती कायदा' लागू करण्याची मागणी होत आहे.