Results | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

GATE 2022 Result Declared: गेट 2022 च्या निकालाची वाट पाहणाऱ्या उमेदवारांची प्रतीक्षा आज संपली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT खरगपूरने GATE 2022 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट gate.iitkgp.ac.in वर जाऊन निकाल पाहू शकतात.

GATE 2022 ची परीक्षा 5, 6, 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी संगणक-आधारित पद्धतीने घेण्यात आली. उमेदवार 21 मार्चपासून GATE 2022 स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतील. GATE स्कोअर कार्ड GATE 2022 वेबसाइटवर उपलब्ध करून दिले जाईल. GATE 2022 स्कोअर घोषणेच्या तारखेपासून तीन वर्षांसाठी वैध असेल. (वाचा - Maharashtra Board Exams 2022: बोर्ड परीक्षेत कॉपी पुरवणार्‍या शाळांची मान्यता रद्द होणार; शालेयमंत्री वर्षा गायकवाड यांचे कडक आदेश)

गेट परीक्षेचे उद्दिष्ट अभियांत्रिकी आणि विज्ञान विषयातील विद्यार्थ्यांच्या पदवी स्तरावरील विषयांचे ज्ञान आणि आकलन तपासणे हा आहे. दरवर्षी लाखो अभियांत्रिकी पदवीधर विद्यापीठे आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून उत्तीर्ण होतात. GATE सध्याच्या स्पर्धात्मक परिस्थितीत, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे मोजमाप आणि चाचणी करणे GATE परीक्षेद्वारेच शक्य आहे.

असा पहा गेट 2022 चा निकाल -

  • सर्वात अगोदर gate.iitkgp.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • होमपेजवर, GATE 2022 निकाल लिंकवर क्लिक करा.
  • स्क्रीनवर एक नवीन पृष्ठ दिसेल.
  • तुमचा रोल नंबर आणि आवश्यक माहिती एंटर करा.
  • सबमिट वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा GATE 2022 चा निकाल स्क्रीनवर दिसेल.

हा निकाल तुम्ही डाउनलोड करू शकता. तसेच भविष्यातील वापरासाठी या निकालाची प्रिंट आउटदेखील काढू शकता.