Exam Dates| Image used for representational purpose | (Photo Credits: Unsplash.com)

GATE 2021 Exam Datesheet: द इंडियन इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (IIT-B)कडून यंदाच्या GATE 2021 exam चं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना पेपर प्रमाणे आणि शिफ्ट टाईम सह संपूर्ण वेळापत्रक पाहता येणार आहे. यासाठी त्यांना gate.iitb.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. यंदा द ग्रॅज्युएट अ‍ॅप्टिट्युट टेस्ट इंजिनियरींग (GATE 2021)ही परीक्षा 5 ते 14 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.

गेट 2021 परीक्षा यंदा सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 3 ते 6 अशा दोन सत्रामध्ये होणार आहे. या परीक्षेचं अ‍ॅडमीट कार्ड 8 जानेवारीपासून डाऊनलोड करण्यासाठी ऑनलाईन उपलब्ध करून दिले जाणार आहे. इथे पहा परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक.

यंदाच्या वर्षी 27 विषयांचा या परीक्षेसाठी समावेश करण्यात आला आहे. दरम्यान महत्त्वाच्या बदलांपैकी एक गोष्ट म्हणजे सायंस आणि इंजिनियरिंग प्रमाणे यंदा ह्युमॅनिटीज या विषयाचा अभ्यास करणारे देखील गेट 2021 परीक्षा देऊ शकणार आहे. environmental science and engineering व humanities and social sciences या दोन नव्या विषयांचा यंदा समावेश करण्यात आला आहे.

गेट 2021 परीक्षा देणार्‍यांना यंदा एकापेक्षा अधिक विषयांची परीक्षा देण्याची मुभा पहिल्यांदाच देण्यात आली आहे. त्यामुळे या नव्या बदलाचं भान ठेवूनच परीक्षेच्या तारखा ठरवण्यात आल्या आहे. यंदा पार पडणारी गेटची परीक्षा 5, 6, 7, 12, 13 आणि 14 फेब्रुवारीला 27 विषयांसाठी होणार आहे. GATE 2021 online Registration: IIT- Bombay कडून गेट 2021 साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन appsgate.iitb.ac.in वर नियोजित वेळेच्या आधीच सुरू.

यापूर्वी गेट परीक्षा देण्यासाठी 10+2+4 असा नियम होता तो आता 10+2+3 करण्यात आला आहे. म्हणजेच आता अंडरग्रॅज्युएट्स असणारे त्यांच्या शिक्षणक्रमाच्या 3 र्‍या वर्षाला असताना देखील आता ही परीक्षा देऊ शकतात. या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी मिळेल.