कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडून प्राध्यापक पदांसाठी भरतीची घोषणा केली असुन उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांना ESIC च्या अधिकृत वेबसाइट esic.nic.in वर अधिक माहिती मिळू शकते. जे उमेदवार सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. अशा उमेदवारांना सरकारी नोकरीची ही एक सुवर्ण संधी आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 491 पदांची भरती करण्यात येणार असुन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जुलै 2022 आहे.
अलीकडच्या काही वर्षात सरकारी नोकरीची संख्या कमी झाल्याचे दिसते. सरकारी नोकर भरतीवर वर तरुणांचे विशेष लक्ष असते. कारण ही पदे प्रशासनातील महत्त्वाची पदे असतात आणि त्यात करियरची (Career) उत्तम संधी असते. ESIC ची नोकरभरती करण्यासाठी एक विशेष पध्दत असते. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा कारण अर्जासाठी फक्त काहीच दिवस शिल्लक आहेत. (हे ही वाचा:-MHT CET 2022 Exam Dates लवकरच होणार जाहीर, Correction Window 30 जूनला होणार बंद; कसा कराल फॉर्म एडीट)
अर्ज पाठवण्याची प्रक्रिया :-
इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरुन प्रादेशिक संचालक, ESI कॉर्पोरेशन, पंचदीप भवन, सेक्टर-16 (लक्ष्मी नारायण मंदिराजवळ), फरिदाबाद-121002, हरियाणा या पत्यावर पाठवावा.
अर्ज भरण्यासाठीची फी :-
सर्व श्रेणींसाठी अर्ज शुल्क 500 रुपये आहे. फक्त SC/ST/PWD/विभागीय उमेदवार, महिला उमेदवार आणि माजी सैनिक यांच्याकडून अर्ज भरण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही.
नोकरीसाठी दिलं जाणारे वेतन :-
निवडलेल्या उमेदवारांना वेतन मॅट्रिक्स स्तर 11 अंतर्गत 67700 रुपये ते 208700 रुपये प्रति महिना वेतन दिल्या जाणार आहे.
नोकर भरतीसाठी पदांची संख्या :-
भरती प्रक्रियेतील पदांची संख्या ४९१ असुन सर्वसाधारण प्रवर्गासाठी 197 पदं, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 82 पदं, एसटी प्रवर्गासाठी 41 पदं, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 126 पदं, प्रवर्गासाठी 45 पदं आहेत.