online ((Photo Credits: Pexels)

महाराष्ट्र कॉमन एंटरन्स टेस्ट MHT CET 2022 exam च्या तारखांबाबत विद्यार्थ्यांच्या मनात उत्सुकता आहे. या परीक्षा ऑगस्ट महिन्यात होण्याची शक्यता आहे पण अद्याप तारखेची घोषणा झालेली नाही. mahacet.org किंवा cetcell.mahacet.org वर ही माहिती मिळणार आहे. पण या परीक्षेला सामोरे जाण्यासाथी उघडण्यात आलेल्या करेक्शन विंडो द्वारा बदल करण्याची मुभा आजपर्यंतच आहे. 23 जून पासून ही करेक्शन विंडो उघडण्यात आली आहे. आता इंजिनियरिंग, फार्मसी, कृषी क्षेत्रात उच्च शिक्षण देणार्‍यांना त्यांच्या अ‍ॅप्लिकेशन मध्ये बदल करण्याची शेवटची संधी आहे.

यंदा ऑगस्ट महिन्यात सीईटी परीक्षा होऊ शकतात. पीसीबी ग्रुपच्या परीक्षा 5 ते 11 ऑगस्ट दरम्यान होतील तर पीसीबी ग्रुपच्या परीक्षा 12 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान होण्याची शक्यता आहेत. नक्की वाचा:  SAVITRIBAI PHULE PUNE UNIVERSITY 2022 ADMISSION : पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कशी असते प्रवेशप्रक्रिया?

MHT CET 2022 चा फॉर्म कसा कराल एडीट

  • अधिकृत वेबसाईट mahacet.org किंवा cetcell.mahacet.org ला भेट द्या.
  • होमपेजवरील 'MHT-CET 2022'च्या लिंकवर क्लिक करा.
  • तुमचे लॉगिन डिटेल्स टाका.
  • फॉर्म मध्ये बदल करून पुन्हा ते सबमीट करा.
  • फॉर्म डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट आऊट काढून ठेवा.

यंदा जेईई आणि नीट परीक्षांचे वेळापत्रक सीईटी सोबत आल्याने यावर्षी ऑगस्ट महिन्यात सीईटी परीक्षा घेतल्या जाऊ शकतात. तत्कालीन उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी अशी घोषणा केली आहे.