Varsha Gaikwad On  School Reopening: इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा कधी सुरु होणार? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती
Varsha Gaikwad | (Photo Credits: Facebook)

कोरोनाकहर (Coronavirus) कमी होत असल्याने राज्य पुन्हा एकदा स्थिरतेकडे वाटचाल करत आहे. त्याच आधाराव टाकत शिक्षण विभाग (Maharashtra State Education Department) शाळा (School ) सुरु करत आहे. दरम्यान, इयत्ता नववी ते 12 पर्यंतच्या शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतल्यानंतर आता राज्यातील आठवी ते नववी पर्यंतच्या शाळा ( School Reopening Class V to VIII ) कधी सुरु होणार याबाबत उत्सुकता आहे. ही उत्सुकता असतानाच राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरुन माहिती देताना म्हटले आहे की, ''यंदा इयत्ता 12वी ची परीक्षा 15 एप्रिलनंतर आणि इयत्ता 10वी ची परीक्षा ही येत्या 1 मे नंतर घेण्याच्या विचार करीत आहोत. आरोग्य अधिकारी यांच्याशी सल्लामसलत करून इयत्ता पाचवी ते आठवीसाठी शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार करीत आहोत. लवकरच निर्णय घेऊ.'' (हेही वाचा, Schools Reopen in Nashik, Pune, Aurangabad From Today: नाशिक, पुणे, औरंगाबाद आदी जिल्ह्यांमध्ये आजपासून शाळा सुरु)

आपल्या ट्विटमधून वर्षा गायकवाड यांनी इयत्ता 10 आणि इयत्ता 12 बोर्ड परीक्षांबाबतही माहिती दिली आहे. 'यंदा इयत्ता 12वी ची परीक्षा 15 एप्रिलनंतर आणि इयत्ता 10वी ची परीक्षा ही येत्या 1 मे नंतर घेण्याच्या विचार करीत आहो'', असे गायकवाड यांनी म्हटले आहे.

दरम्यान, नाशिक, पुणे, औरंगाबाद आणि पालघर या चारही जिल्ह्यांतील इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा आजपासून (4 जानेवारी 2021) सुरु होत आहेत. कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट काळात शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता प्रदीर्घ काळानंतर शाळा सुरु होत आहेत. दरम्यान, मुंबई महापालिका हद्दीतील शाळा 15 जानेवारीपर्यंत बदच राहणार आहेत.