नाशिक (Nashik), पुणे (Pune), औरंगाबाद (Aurangabad) आणि पालघर जिल्ह्यातील विद्यार्थी, पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या चारही जिल्ह्यांतील इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा आजपासून (4 जानेवारी 2021) सुरु होत आहेत. कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट काळात शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता प्रदीर्घ काळानंतर शाळा सुरु होत आहेत. दरम्यान, मुंबई महापालिका हद्दीतील शाळा 15 जानेवारीपर्यंत बदच राहणार आहेत.
मुंबई महापालिका आयुक्तांनी यााबत निर्णय घेतला आहे. (हेही वाचा, ITI Admission 2020: 10वी पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आजपासून admission.dvet.gov.in वर करता येणार ऑनलाईन अर्ज)
शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने या आधीच घेतला होता. त्यानुसार 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरु करण्यात येत होत्या. परंतू, कोरना व्हायरस संक्रमनाचा धोका आणि एकूण परिस्थिती पाहून शाळा सुरु किवा बंद ठेवण्याबाबत महापालिका आणि जिल्हा स्तरावर शाळांबाबत निर्णय घेण्याची मुभा राज्य सरकारने दिली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी शाळा पुन्हा एकदा बंद ठेवण्यात आल्या. परिणामी आजपूसून नाशिक, पुणे, औरंगाबाद आणि पालघर जिल्ह्यातील शाळा सुरु होत आहेत.
आगोदर खबरदारी मग प्रवेश
शाळा आजपासून सुरु होत असल्या तरी, योग्य ती खबरदारी घेऊनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जात आहे. त्यासाठी सर्व शाळा आगोदर सॅनिटाईज करण्यात आल्या आहेत. शिवाय शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची आरोग्य तपासणी करुनच शाळांमध्ये प्रवेश दिला जात आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना वर्गात बसण्याबाबत पालकांचे संमतीपत्र घेतले जात आहे. संमतीपत्र असलेल्या विद्यार्थ्यांनाच शाळांमध्ये प्रवेश दिला जात आहे. सरकारने घालून दिलेले कोरोनाबाबतचे नियम पाळूनच शाळांना वर्ग सुरु करण्यास अनुमती आहे.