7th Pay Commission: संरक्षण मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या DRDO मध्ये सरकारी नोकरीची संधी, सातवा वेतन आयोग नुसार मिळणार घसघशीत पगार
DRDO Job Salary at 7th Pay commission | (Photo credit: archived, edited, symbolic images)

DRDO Job Salary at 7th Pay commission: संरक्षण मंत्रालय (Ministry of Defense) अंतर्गत येणाऱ्या डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (Defence Research and Development Organisation) म्हणजेच डीआरडीओ (DRDO) ला डिप्लोमा किंवा आयटीआय उत्तीर्ण उमेदवार पाहिजे आहे. DRDO ने प्रसिद्ध केलेल्या जाहीरातीनुसार एकूण 351 टेक्निशियन-A दर्जाची पदे भरायची आहेत. जर आपल्याकडे डिप्लोमा उत्तीर्ण किंवा आयटीआय सर्टिफिकेट असेल तर आपण या पदासांसाठी 26 जून या दिवसापर्यंत अर्ज करु शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नियम आणि अटींनुसार आपली निवड झाल्यास आपल्याला मिळणारे वेतन हे थेट सातवा वेनत आयोग (7th Pay Commission) नुसार मिळेल.

अधिकृत बेवसाइट www.drdo.gov.in वर उपलब्ध असलेल्या नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट म्हटले आहे की, जर आपण नियोजित तारखेपूर्वी उच्च शिक्षण जसे की, एमएससी, बीटेक, बीई किंवा पीएचडी किंवा तत्सम शिक्षण पूर्ण केले आहे तर, आपण या पदांसाठी अर्ज करुन नयेत. या पदासाठी केवळ उच्च माध्यमिक (हायस्कूल) शिक्षण पूर्ण असलेल्या उमेदवारांची आवश्यकता आहे. इथे क्लिक करुन तुम्ही कोणकोणत्या सरकारी विभागांमध्ये कोणत्या पदांसाठी भरती निघाली आहे हे पाहू शकता.

दरम्यान, www.drdo.gov.in वर अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी शक्य तितक्या लवकर अर्ज करण्यास हरकत नाही. वरील पोस्टसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जून 2019 इतकी आहे. दरम्यान, अर्ज करण्यापूर्वी हे जरुर तपासून पाहा की, हायस्कूल शिक्षणाशिवाय आपण ज्या विभागाशी सबंधीत नोकरीसाठी अर्ज करता आहात त्या संबंधीत आयटीआय प्रमाणपत्र आपल्याकडे आहे का. (हेही वाचा, खुशखबर! बँकिंग क्षेत्रात तब्बल 7 हजार पेक्षा जास्त पदांची भरती; जाणून घ्या महत्वाच्या तारखा आणि कुठे कराल अर्ज)

महत्त्वाचे म्हणजे DRDO ने या पदासाठी वयोमर्यादाही निश्चित केली आहे. प्राप्त माहितीनुसार, उमेदवाराचे वय हे 18 वर्षांपुढे ते 28 वर्षे इतके असावे. दरम्यान, आरण श्रेणीतील उमेदवार, विधवा आणि घटस्फोटीत महिलांसाठी नियमांनूसार वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे.