CUET-UG Phase 4 Exam आता 30 ऑगस्टला; NTA ने जारी केलं नवं नोटिफिकेशन
Exam | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

University Grants Commission कडून 17-20 ऑगस्ट दरम्यान होणारी Central Universities Common Entrance Test आता 30 ऑगस्ट पर्यंत लांबणीवर पडली आहे. सुमारे 11,000 परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्रासाठी शहराची निवड करता यावी म्हणून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. CUET ही भारतात होणारी दुसरी मोठी प्रवेश परीक्षा आहे. यासाठी 14.9 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे.

NTA च्या माहितीनुसार, दुसर्‍या टप्प्यात होणारी CUET UG exam जी 4,5,6 ऑगस्टला झालेल्या परीक्षेत जे तांत्रिक त्रृटीमुळे किंवा परीक्षा केंद्र रद्द झाल्यामुळे सहभागी होऊ शकले नाहीत त्यांना आता फेझ 6 मध्ये सहभागी होता येईल. ही परीक्षा 24-30 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. त्यांची अ‍ॅडमीट कार्ड्स 20 ऑगस्टला प्रसिद्ध केली जाणार आहेत.

एनटीए कडून फेझ 4 च्या परीक्षार्थ्यांना नव्याने अ‍ॅडमीट कार्ड्स दिली जाणार आहेत. ही अ‍ॅडमीट कार्ड्स CUET website cuet.samarth.ac.inवर उपलब्ध असणार आहेत. 5,6 फेझ मधील परीक्षार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रांबद्दल लवकरच माहिती मिळणार आहे.

(हे देखील नक्की वाचा: UGC-NET Examination Postponed: यूजीसी-नेट दुसर्‍या सत्रातील परीक्षा लांबणीवर; पहा नव्या तारखा!).

28 ऑगस्ट पर्यंत सार्‍या परीक्षा घेऊन पूर्ण करण्याचा एनटीए चा प्लॅन होता पण आता ही परीक्षा 6 फेझ मध्ये विभागली गेल्याने वेळापत्रक थोडं पुढे गेले आहे.