मानव संसाधन विकास मंत्रालय (MHRD) यांनी या वर्षात होणारी NEET 2020 ची परीक्षा कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलली आहे. देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने सरकारकडून त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवसरात्र काम केले जात आहे. तसेच देशात येत्या 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व बोर्डांनी त्यांच्या परिक्षा रद्द केल्या आहेत. तसेच आगामी परिक्षा सुद्धा आता कोरोना व्हायरमुळे स्थगित करण्यात आल्या आहेत. परंतु नीट 2020 ची परिक्षा रद्द करण्याबाबत स्पष्ट करण्यात यापूर्वी आले नव्हते.
एएनआय यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, मिनिस्टरी ऑफ ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट यांनी यंदाची नीट 2020 ची परिक्षा कोरोना व्हायरच्या पार्श्वभुमीवर पुढे ढकलली आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसने जगभरात आपले जाळे पसवरले असून चीन नंतर आता इटली येथे सर्वाधिक मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांना वारंवार स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे.(Coronavirus Outbreak In India: देशांतर्गत विमानसेवा देखील 14 एप्रिल पर्यंत स्थगित)
Ministry of Human Resource Development (MHRD) has postponed the National Eligibility cum Entrance Test (NEET) exam. pic.twitter.com/wGUxU0kd2o
— ANI (@ANI) March 27, 2020
नीट परिक्षेचे अॅडमिट कार्ड शुक्रवारी जाहीर करण्यात येणार होते पण आता ते स्थगित केले आहे. एनटीएच्या अधिकाऱ्यांनी असे सांगितले आहे की, 14 एप्रिलला या संदर्भात पुन्हा चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर कधी पुन्हा अॅडमिट कार्ड जारी करायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे. नीट परीक्षेचे आयोजन 3 मे रोजी करण्यात आले होते. मात्र कोरोनामुळे नीटची परीक्षा पुढे ढकलल्याने त्याची नवी तारखेबाबत सांगण्यात आलेले नाही.