UPSC | Representational Image (Photo Credits: PTI)

UPSC Exam 2018 Results:  युपीएससी 2018 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. कनिष्क कटारिया (Kanishak Kataria ) प्रथम क्रमांकावर आहे. देशातील पहिल्या 50 यशवंतांमध्ये 5 मराठी चेहरे आहेत. यामध्ये सृष्टी  देशमुख (Srushti Jayant Deshmukh) ही मराठमोळी मुलगी पाचव्या स्थानी आहे. यासोबतच तृप्ती धोडमिसे, मनीषा आव्हाळे,वैभव गोंदणे या मराठी मुलांचा समावेश आहे. सृष्टी  देशमुख देशामध्ये पाचवी असली तरीही मुलींमध्ये अव्वल ठरली आहे.

कुठे पहाल   युपीएससी 2018 चा निकाल?

युपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर यूपीएससी परीक्षेतील यशवंतांची यादी जाहीर करण्यात आली आहे. येथे क्लिक करून पहा सविस्तर यादी.

सृष्टी  देशमुख

कनिष्क कटारिया

सिव्हिल सर्विस एक्झाम मध्ये विद्यार्थ्यांना तीन टप्प्यांमधून जावं लागतं. यामध्ये प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा तीन टप्प्यांमध्ये विद्यार्थ्यांचे गुण पाहता अंतिम निकाल जाहीर केला जातो. यंदा मुलाखतीसाठी चार फेब्रुवारी 2019 पासून सुरूवात झाली होती. दिल्लीच्या युपीएससी ऑफिसमध्ये या मुलाखती पार पडल्या आणि त्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला आहे.