मंदीचा फटका सध्या ब-याच खाजगी कंपन्यांना बसत असताना लोकांना सद्य परिस्थितीत लोकांना खात्रीलायक वाटणारी नोकरी म्हणजे सरकारी नोकरी. अशी सरकारी नोकरीच्या शोधात असणा-यांसाठी आनंदाची बातमी. सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ, सुरक्षा अधिकारी पदासह 76 जागांसाठी भरती निघाली आहे. आजपासून या पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून या 76 जागांपैकी विशेष आणि मोठ्या पदांची ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर 2019 तर अन्य पदांसाठी अंतिम तारीख 12 नोव्हेंबर 2019 ही आहे.
या 76 जागा खालील देण्यात आलेल्या पदांमध्ये विभागण्यात आल्या आहेत
1. माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ-26
2. सुरक्षा अधिकारी- 10
3. रिस्क मॅनेजर- 12
4. फायनानशिअल अॅनॅलिस्ट- 10
5. इकॉनॉमिस्ट- 01
6. CDO- 01
7. डाटा अॅनेलिस्ट-03
8. अॅनेलेटिक्स-सिनिअर मॅनेजर- 02
9. डेटा इंजिनीअर- 02
10. डेटा आर्किटेक्ट- 02
11. CA- 05
12. मुख्य तांत्रिक अधिकारी- 01
13. चीफ रिस्क ऑफिसर- 01
या बाबत सविस्तर माहिती मिळवण्यासाठी www.centralbankofindia.co.in या त्यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खाली दिलेले शुल्क आकारले जाईल
1. खुल्या वर्गासाठी विशेष पदांकरिता- 550 रुपये
2. राखीव वर्गासाठी विशेष पदांकरिता- 50 रुपये
3. खुल्या वर्गासाठी अन्य पदांकरिता- 950 रुपये
4. राखीव वर्गासाठी अन्य पदांकरिता- 50 रुपये
विशेष पदांकरिता सविस्तर माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा.
तसेच अन्य पदांकरिता सविस्तर माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा
सेंट्रल बँक ऑफ इंडिया निघालेली ही भरती खूप महत्त्वाची आणि चांगल्या पगाराची आहे. त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.