CBSE Class 12 Compartment Result Released: सीबीएसई कडून कंपार्टमेंट आणि इम्प्रूवमेंट परीक्षांचा निकाल जाहीर; cbse.gov.in वर असे पाहा मार्क्स
Results | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

सीबीएसई (Central Board of Secondary Education) कडून श्रेणीसुधार (Improvement Exam), कम्पार्टमेंट (Compartment)आणि प्रायव्हेट एक्झाम (Private Exams) चा CBSE Class 12 Result 2021 जाहीर करण्यात आला आहे. सीबीएसईचा हा स्पेशल एक्झाम आणि खाजगी विद्यार्थ्यांचा निकाल आता अधिकृत वेबसाईट cbse.gov.in आणि cbseresults.nic.in वर पाहता येणार आहे. यंदा 12वी साठी श्रेणीसुधार परीक्षा 25 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर दरम्यान कोविड 19 नियमावलींचं काटेकोर पालन करून करण्यात आलं होतं. या डिरेक्ट लिंक वर देखील तुम्हांला निकाल पाहता येऊ शकतो.

कसा पहाल CBSE Class 12 Result 2021?

  • सीबीएसईची अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in ला भेट द्या.
  • होम पेज वर “Senior School Certificate Compartment Examination Class 12 Result 2021" या लिंक वर क्लिक करा.
  • तुमचा रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर किंवा इतर क्रेडेन्शिअल एंटर करा.
  • सबमीट बटण वर क्लिक केल्यानंतर तुमचा 12वीचा निकाल पाहता येईल.
  • निकालाची प्रत डाऊनलोड करून प्रिंट काढता येऊ शकते.

यंदाच्या वर्षी सीबीएसई ने 12वीचा निकाल 30 जुलैला जाहीर केला होता.यंदा 99.37% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 70,004 विद्यार्थ्यांना 95% पेक्षा जास्त मार्क्स मिळवले आहेत. 1,50,152 विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त मार्क्स मिळाले आहेत. 6,149 विद्यार्थ्यांनीcompartment चा पर्याय निवडला आहे. नक्की वाचा:  CBSE ‘DADS’ Portal: आता सीबीएसई च्या विद्यार्थ्यांना डुप्लीकेट मार्कशीट, माइग्रेशन सर्टिफिकेट मिळवण्यासाठी खास ऑनलाईन सुविधा; इथे पहा त्याचे दर!

यंदा भारतात कोविड 19 च्या दुसर्‍या लाटेच्या प्रभावामुळे 10वी, 12वीच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या. परीक्षा निकाल अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने लावण्यात आला होता.