सीबीएसई बोर्डाने (Central Board of Secondary Education) आता त्यांच्या विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी नवं पोर्टल लॉन्च केले आहे. या द्वारा विद्यार्थ्यांना ड्युप्लिकेट मार्क्सशीट आणि सर्टिफिकेट उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या पोर्टलचं नाव Duplicate Academic Document System (DADS)आहे. ज्या विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाईट -cbse.gov.in पहावी लागणार आहे. दरम्यान ही नवी ऑनलाईन सुविधा सशुल्क आहे. इथे पहा DADS ची थेट लिंक.
सध्या कोविड 19 संकटकाळात विद्यार्थ्यांना त्याची मौल्यवान कागदापत्र सहज, सुरक्षित उपलब्ध करुन देण्यासाठी हा DADS Portal चा पर्याय पुढे आला आहे. तुम्ही ऑनलाईन अर्ज केल्यानंतर सीबीएसई बोर्डाचे रिजनल ऑफिस संबंधित कागदपत्राची छपाई करून स्पीड पोस्टने तुमच्या पत्त्यावर पाठवले जाईल. यामध्ये विद्यार्थ्यांचा वेळ, मेहनत वाचणार आहे. या नव्या पोर्टलच्या माध्यमातून ड्युप्लिकेट मार्क्सशीट, पासिंग सर्टिफिकेट, मायग्रेशन सर्टिफिकेट ऑनलाईन पोर्टल द्वारा मिळणार आहे. यामध्ये तुम्हांला आता डिजिटल कॉपी हवी की फिजिकल कॉपी हा पर्याय देखील आहे. स्पीड पोस्ट द्वारा पाठवले जाणारे पोस्ट तुम्ही ट्रॅकिंग आयडी द्वारा कुठ पर्यंत आले आहे हे पाहू शकणार आहे.
अॅप्लिकेशन फी
2017पूर्वीच्या कागदपत्रांसाठी - 100 रूपये
5 वर्षापर्यंत - 250 रूपये
5-10 वर्षापेक्षा जास्त - 500 रूपये
10-20 वर्षांपेक्षा जास्त - 1000 रूपये
आता पर्यंत विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या ड्युप्लिकेट कॉपी हव्या असल्यास त्यासाठी रिजनल ऑफिस मध्ये अर्ज सादर करावा लागत होता. त्यानंतर बॅंकेमध्ये शुल्क भरावा लागत होता. पण आता हीच सुविधा ऑनलाईन करण्यात आली आहे.