CBSE 10th Result And Toppers List: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (CBSE) ने इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर केला. या वेळीही या परीक्षेत नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली. विद्यार्थी आणि पालक class 10th Result CBSE चे अधिकृत संकेतस्थळ www.cbse.nic.in वरही हा निकाल पाहू शकतात. या परीक्षेत अव्वल गुण मिळवत टॉपर राहीलेल्या विद्यार्थ्यांबाबत घ्या जाणून.
केरळ येथील भावना एन शिवदास (Bhavana N Sivadas) ही विद्यार्थिनी 500 पैकी 499 गुण मिळवत CBSE Class-10th Exams मध्ये प्रथम क्रमांकावर राहिली आहे.
Bhavana N Sivadas from Kerala is the all India topper in CBSE Class-10th Exams with 499 marks out of 500. https://t.co/wInuOIpNH5
— ANI (@ANI) May 6, 2019
दरम्यन, प्राप्त माहितीनुसार, सेनीपत येथील लिटिल एंजल्स स्कूल विद्यार्थीनी अपूर्वा गुलाटी आणि वनस्थळी पब्लिक स्कूल, वसुंधरा, गाजियाबाद येथील विद्यार्थीनी रिद्धिमा या विद्यार्थीनींनी 500 पैकी 99.4 टक्के गुण मिळवत विभागून तिसरा क्रमांक पटकावला. तर, गुरुग्राम येथील एमिटी स्कूल मधील विद्यार्थ्यांनी 500 पैकी 497 इतके गुण मिळवत अव्वल क्रमांक पटकावला. 497 गुण मिळवत अव्वल राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकूण 14 इतकी असल्याचे समजते. (हेही वाचा, CBSE Class 10 Results 2019: सीबीएसई बोर्डाचा दहावी निकाल cbse.nic.in वर जाहीर)
Total pass percentage in CBSE Class-10th Exams is 91.1 %; Trivandrum (99.85%), Chennai (99%), Ajmer (95.89%) are top three regions. pic.twitter.com/JBpHZGF0q1
— ANI (@ANI) May 6, 2019
सीबीएसई इयत्ता 10 वी परीक्षेत एकूण 86.70 टक्के विद्यार्थी पास झाले. सीबीएसई बोर्ड नेहमी पत्रकार परीषद घेऊन परीक्षेचा निकाल जाहीर करते. मात्र, यंदा निकाल जाहीर करण्याचा पॅटर्न बोर्डाने बदलला असून, पत्रकार परिषद न घेताच निकाल जाहीर केला आहे. त्यामुळे सविस्तर निकाल जाणून घेण्यासाठी तुम्ही www.cbse.nic.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.