CBSE Class 10 Results 2019: सीबीएसई बोर्डाचा दहावी निकाल cbse.nic.in वर जाहीर
सीबीएसई दहावीचा निकाल cbse.nic.in या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे.
10th CBSE Board Results: सीबीएसईचा बारावीच्या (12th) पाठोपाठ आता दहावीचा (10th) निकालदेखील जाहीर करण्यात आला आहे. यामध्येही बारावीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे दहावीच्याही मुलींनी बाजी मारली आहे. सीबीएसई संपूर्ण निकाल, टॉपर्स आणि इतर माहिती तुम्ही cbse.nic.in वर पाहू शकता. दहावीचा निकाल परीक्षेनंतर 38 दिवसांमध्ये जाहीर केला आहे. 29 मार्च दिवशी दहावीची परीक्षा संपली होती.
सीबीएसई दहावीचा निकाल कसा पहाल?
- बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट्स cbseresults.nic.in किंवा cbse.nic.in उघडा.
- होम पेज वरील दहावी इयत्तेचा निकाल पाहण्यासाठी Class 10 Result 2019 वर क्लिक करा.
- तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक, रोल नंबर व प्रवेशपत्रावरील योग्य ती माहिती नेमून दिलेल्या रकान्यात भरा, आणि सबमिट करा.
- तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल त्यातील मार्क्स व आपले नाव तपासून घेऊन मग त्याची प्रिंट काढा.
एएनआय ट्विट
Central Board of Secondary Education(CBSE) announces Class 10th results. pic.twitter.com/adHzv1wJJU
— ANI (@ANI) May 6, 2019
यंदा जवळपास 18.19 लाख विद्यार्थ्यांनी दहावी बोर्डाची परीक्षा दिली होती. सीबीएसई दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आता स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांनाही त्यांच्या निकालाचे वेध लागले आहेत. यंदा राज्यात जून 2019 च्या सुरुवातीपर्यंत हे निकाल जाहीर होतील असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 06, 2019 02:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

