CBSE Class 10 Exams Result 2023: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) द्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. सीबीएसईने आज (12 मे) रोजी हा निकाल जाहीर केला आहे. विशेष म्हणजे इयत्ता 12वीचाही निकाल आजच जाहीर झाला आहे. म्हणजेच सीबीएसईने इयत्ता 10वी आणि 12वी या दोन्ही इयत्तांचा निकाल एकाच दिवशी जाहीर केला आहे. इयत्ता 10 वीचा निकाल CBSE 10वीचे निकाल 2023 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in वर उपलब्ध आहे. याशिवाय विद्यार्थी त्यांचे CBSE इयत्ता 10वीचे निकाल उमंग अॅप आणि डिजीलॉकरद्वारे देखील पाहू शकतात.
दरम्यान, सीबीएसईद्वारे जाहीर झालेला निकाल विद्यार्थी, पालक, आणि शाळांसह सर्व इच्छुकांसाठी खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळांवर म्हणजे वेबसाईटवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खाली दिलेल्या संकेतस्थळांना भेट द्या. (हेही वाचा, CBSE Result On DigiLocker: सीबीएसई निकाल 'डिजिलॉकर'वरही उपलब्ध, पण कसा पाहाल? घ्या जाणून)
सीबीएसईचे निकाल उपलब्ध असलेल्या काही वेबसाइट्स
CBSE 10वीचा निकाल 2023 कसा डाउनलोड कराल?
CBSE बोर्डाची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in किंवा cbseresults.nic.in ला भेट द्या
मुख्यपृष्ठावर उपलब्ध CBSE इयत्ता 10वी निकालाच्या लिंकवर क्लिक करा
तुमचा रोल नंबर, शाळा क्रमांक, प्रवेशपत्र आयडी टाका योग्य ठिकाणी भरुन क्लिक करा
तुमचा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल
CBSE 10वी निकाल आपण डाऊनलोड आणि प्रिंटही करु शकता
CBSE ने इयत्ता 10 ची परीक्षा 24 फेब्रुवारी ते 10 मार्च 2023 या कालावधीत घेतली होती. या परीक्षेला एकूण 34.8 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, ज्यात 21.4 लाख मुली आणि 13.4 लाख मुलांचा समावेश होता.