भारतामध्ये सध्या कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सुरू असल्याने आता त्याचा संसर्ग रोखण्यासाठी भारत सरकारने कडक पावलं उचलण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान 25 मार्चपासून पुढील 21 दिवसांचा लॉकडाऊनदेखील जाहीर करण्यात आला आहे. मात्र त्यापूर्वीच देशात सुरू असलेल्या सीबीएसई परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. देशाता 10,12च्या बोर्ड परीक्षा मध्येच खंडीत करून अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र आता यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सीबीएसईच्या 12 वीच्या विद्यार्थ्यांची भूगोल, हिंदी आणि बिझनेझ स्टजीज या विषयाच्या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. मात्र आता परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना आणि पालकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी खास हेल्पलाइनची सोय देण्यात आली आहेत. काही शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी नेमण्यात आले आहेत. त्यांच्यामार्फत शंका दूर केल्या जातील. देशभरात जिल्हा स्तरावर ही सोय आता खुली करून दिली जात आहे.
देशामध्ये लागू करण्यात आलेला लॉकडाऊन 14 एप्रिलच्या पुढे वाढवण्याचा सरकारचा अद्याप कोणताही विचार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपताच लवकरच परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर केल्या जातील. सारे सुनियोजित झाल्यास एप्रिल 2020 च्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे मध्यापर्यंत या तारखा असू शकतात. Coronavirus Outbreak: सीबीएसईसह सर्व शैक्षणिक संस्थांच्या चालू परीक्षा 31 मार्चपर्यंत तहकूब; मानव संसाधन विकास मंत्रालयाचा आदेश.
देशामध्ये कोरोना व्हायरस संसर्गाचे संकट गंभीर आहे. चीनमधून सुरू झालेला कोरोना व्हायरसचा संसर्ग आता जगभर पोहचला आहे.भारतामध्येही 1600 पेक्षा अधिक कोरोनाग्रस्त आढळले आहेत. अद्याप कोरोनावर कोणतेही औषध नसल्याने आता नागरिकांना सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या घरी रहा सुरक्षित रहा असे आदेश देण्यात आले आहेत.