कॉमन अॅडमिशन टेस्ट म्हणजेच CAT Result 2020 आता जाहीर झालेला आहे. यंदा एमबीएच्या परीक्षेसाठी कॅट ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना हा निकाल अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच iimcat.ac.in वर त्यांचे मार्क्स पाहता येणार आहे. यावर्षीच्या निकालामध्ये 9 विद्यार्थ्यांनी 100% गुण पटकावले आहे. दरम्यान अद्यापही ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचे कॅट परीक्षेचे गुण पाहिले नसतील त्यांना अधिकृत संकेतस्थळ iimcat.ac.inवर त्यांचे मार्क्स पाहता येणार आहेत. IIM -Indore कडून कॅट 2020 यंदा 29 नोव्हेंबरला घेण्यात आली होती. कम्युटर बेस्ड टेस्ट मोड मध्ये झालेल्या या परीक्षेची फायनल आन्सर की 31 डिसेंबर दिवशी प्रसिद्ध करण्यात आली होती.
वेबसाईटवर लॉगिंग विंडोमध्ये स्कोअरकार्ड उपलब्ध आहे. त्यालिंकवर क्लिक करून लॉगिंग डिटेल्स भरून मार्क्स पाहता येतील. तुमचा निकाल आणि स्कोअरकार्ड ऑनलाईन कसं पहायचं या साठी या स्टेप्सदेखील तुम्ही फॉलो करून निकाल पाहू शकता. MHT CET 2020: B.Tech, B. Pharma ची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट mahacet.org जाहीर; अशी पहा यादी.
कॅट 2020 परीक्षेचा निकाल कसा व कुठे पहाल?
- iimcat.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- होम पेज वर लॉगिंगच्या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर ओपन होणार्या विंडोवर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड टाका.
- तुमच्या अकाऊंटमध्ये तुम्हांला तुमचा निकाल पाहता येईल.
2020 या वर्षावर कोरोनाचं संकट होतं. मात्र अशा परिस्थितीमध्येही 2 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. कॅट 2020 स्कोअरकार्ड तुम्हांला लॉगिंग विंडो मधून डाऊनलोड करता येईल. हा कॅट परीक्षेचा स्कोअर केवळ एमबीए कोर्स साठी 2021-22 च्या सेशनसाठी ग्राह्य धरला जातो. दरम्यान आता अॅडमिशन प्रोसेस ही विद्यार्थ्यांकडून पाठवण्यात आलेल्या अॅप्लिकेशन द्वारा पार पडेल. सोबतच कॅट परीक्षा पार पाडली म्हणजे विद्यार्थ्यांना IIMs मध्ये प्रवेश मिळेलच असे होत नाही.