MHT CET 2020: B.Tech, B. Pharma ची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट mahacet.org जाहीर; अशी पहा यादी
Online Application | Photo Credits: Pixabay.com

महाराष्ट्र सीईटी सेल कडून MHT CET 2020 Provisional Merit लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये बी टेक, बी फार्मा/ फार्मा डी या कोर्सचा समावेश आहे. दरम्यान महाराष्ट्र आणि देशभरातील विद्यार्थ्यांसाठीची ही प्रोव्हिजनल मेरीट लिस्ट आता सीईटी सेलच्या mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. काल 1 जानेवारीला ती प्रदिद्ध करण्यात आली असून विद्यार्थी आता ती ऑनलाईन पाहू शकतात.

जम्मू कश्मीर आणि लदाख मधील विद्यार्थ्यांसाठी फायनल मेरीट लिस्ट देखील तयार असून ती ऑनलाईन उपलब्ध आहे. सीईटी सेल कडून B.Arch, MCA सोबत काही कोर्ससाठी प्रोव्हिजनल मेरीट लिस्ट 1 जानेवारी 2021 ला प्रसिद्ध केली आहे. आता सीईटी सेलच्या अधिकृत वेबसाईटवर ही यादी कशी पहायची हे पहायचं असल्यास खालील स्टेप्स नक्की फॉलो करा.

MHT CET 2020 Provisional Merit List कशी पहाल?

  • महाराष्ट्र सीईटी सेलच्या mahacet.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • होम पेज वर बी ई / बी टेकच्या किंवा तुमच्या कोर्स नुसार लिंक दिसतील त्यावर क्लिक करा.
  • स्क्रिनवर तुम्हांला प्रोव्हिजिनल मेरीट लिस्ट पाहता येईल.
  • MHT CET Percentile च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लिस्ट मध्ये त्यांचं नाव तपासता येईल.

बीई / बी टेक ची अंतिम यादी 6 जानेवारी दिवशी प्रसिद्ध केली जाणार आहे. तर एमबीए कोर्सची अंतिम यादी 7 जानेवारी 2021 दिवशी प्रसिद्ध केली जाणार आहे. तर अ‍ॅग्रिकल्चर कोर्सच्या काऊंसलिंग मध्ये बदल करण्यात आला आहे. आता या कोर्सची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 4 जानेवारी 2दिवशी प्रसिद्ध केली जाणार आहे.