भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्सच्या संस्थेने (ICAI) ने CA फाउंडेशन परीक्षा डिसेंबर 2022 चा निकाल icai.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर (CA Foundation Result Dec 2022 Declared) केला. जो आपण या वेबसाईटवर लॉग इन करून पाहू शकता. मात्र, त्यासाठी आपल्याला निश्चीत पर्यायांचा वापर करावा लागेल. जेणेकरुन स्कोअरकार्ड (CA Foundation Result Scorecard ) आणि गुणवत्ता यादी (CA Foundation Result Merit List) डाउनलोड करणे आपल्याला सहज शक्य होईल. ही यादी कशी पाहाल? घ्या जाणून.
डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट्स फाउंडेशन परीक्षेचा निकाल शुक्रवारी (3 फेब्रुवारी, 2023) जाहीर झाला. या निकालाची विद्यार्थी आणि पालक प्रदीर्घ काळापासून वाट पाहात होते. ICAI CA फाउंडेशनकडून ही परीक्षा डिसेंबर 14 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. जे विद्यार्थी CA फाउंडेशन परीक्षा उत्तीर्ण होतात ते फाउंडेशन कोर्समध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरतात.
Important Announcement - Results of the ICAI Chartered Accountancy Foundation Examination held in December 2022 have been declared.
Candidates can check the result athttps://t.co/OyKv3HAsSU pic.twitter.com/jo1HwbBYYG
— Institute of Chartered Accountants of India - ICAI (@theicai) February 3, 2023
ICAI वर तुमचे CA फाउंडेशन परीक्षेचे निकाल कसा पाहाल?
प्रथम icai.nic.in वर लॉग इन करा. त्यानंतर होमपेजवर दिलेल्या निकालाशी संबंधीत लिंकवर क्लिक करा. आता तुम्हाला तुमचा रोल नंबर आणि नोंदणी क्रमांक विचारला जाईल. त अचूक भरा. (हा क्रमांक अचूक असणे आवश्यक आहे. जेणेकरुन तुम्हला तुम्हास हव्या असलेल्या विद्यार्थ्याचा निकाल पाहता येईल.) आता तुम्हाला कॅप्चा कोड भरावा लागेल. तो भरतातच सबमिट बटण दाबा. तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल. जो तुम्ही डाऊनलोडही करु शकता. त्याची प्रिंटही काढू शकता.