Arvind Kejriwal Government Decision: शैक्षणिक परंपरा, शिस्त, बांधिलकी आणि मुलांचे लक्ष विचलीत होण्याला प्रतिबंध घालण्यासाठी दिल्ली सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. दिल्ली शिक्षण संचालनालय (DoE) द्वारा जाहीर करण्यात आलेल्या निर्णयानुसार यापुढे शालेय आवारात खास करुन वर्गामध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल वापरता येणार नाही. शाळेत मोबाईल बंदी (Ban On Mobile Phones In School Classrooms) निर्णय राजधानी शहर प्रशासनांतर्गत येणाऱ्या सर्व शहरातील सरकारी आणि खाजगी शाळांसाठी लागू असेल. शिक्षणाला चालना देण्यावर भरत देत सरकारने हा निर्णय घेतला आहे.
दिल्ली सरकारच्या शिक्षण संचालनालयाने गुरुवारी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, विद्यार्थ्यांना शालेय परिसरात मोबाईल फोन वापरण्यास पूर्ण मनाई असेल. पालकांनाही विनंती की, त्यांचे पाल्य शाळेच्या आवारात मोबाईल फोन घेऊन जाणार नाही याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये जर फोन आणलाच तर शाळांनी त्याबाबत आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करुन द्यावी. जसे की, लॉकर, सुरक्षीतता.
दरम्यान, केवळ विद्यार्थीच नव्हे तर शिक्षकांनाही मोबाईल फोन न वापरण्याचे अवाहन करण्यात आले आहे. खास करुन वर्गखोल्या, खेळाचे मैदान, प्रयोगशाळा, वाचनालय अशा शैक्षणिक संवाद आणि घडामोडी चालतात अशा ठिकाणी. मोबाईल बंदीमुळे पालक-विद्यार्थी आणि शाळा यांना आपत्त्कालीन स्थितीत संवादाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मात्र, त्यासाठी शाळा, संस्था अथवा शिक्षक हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करुन देऊ शकतात. सर्व सरकारी, खाजगी विनाअनुदानित/अनुदानित मान्यताप्राप्त शाळांचे सर्व HoS/व्यवस्थापक यांना सरकारी निर्णयाची माहिती सर्व विद्यार्थी आणि पालकांना तसेच त्यांच्यामध्ये काम करणार्या सर्व शिक्षक/शिक्षकेतर कर्मचार्यांपर्यंत पोहोचवण्यास सांगण्यात आले आहे.