कोरोना विषाणूचा (Coronavirus) परिणाम जसा विविध क्षेत्रांवर झाला तसाच तो शिक्षण व्यवस्थेवरही झाला. देशात गेले काही महिने ऑनलाईन शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. या दरम्यान महाराष्ट्रात्त शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या पुढाकाराने अनेक योजना राबवल्या गेल्या. आता यामध्ये अजून एका गोष्टीची भर पडत आहे. इयता 1 ली ते इ. 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर इंग्रजी विषयाचा कार्यक्रम सुरु केला जाणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.
आपल्या ट्वीटमध्ये त्या म्हणतात, ‘इ. 1 ली ते इ. 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी दि. 4 जानेवारी 2021 पासून DD सह्याद्री वाहिनीवर सोमवार ते गुरुवार दुपारी 3.30 ते 4.30 व 5 ते 6 या कालावधीत A Special English Hour नावाने इंग्रजी विषयासाठी कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे.’
इ. १ ली ते इ. ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी दि. ४ जानेवारी २०२१ पासून DD सह्याद्री वाहिनीवर सोमवार ते गुरुवार दुपारी ३.३० ते ४.३० व ५.०० ते ६.०० या कालावधीत A Special English Hour नावाने इंग्रजी विषयासाठी कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @scertmaha
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) December 29, 2020
यासोबतच, मैदानी खेळ बंद असल्याने एकाकी पडलेल्या लहानग्यांसाठी ‘राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद’,’प्रथम बुक्स’ व ‘युनायटेड वे इंडिया’ यांनी ‘मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. 08068264448 वर मिस्ड कॉल देऊन मुलांना मराठी, हिंदी व इंग्रजीत गोष्टीं ऐकता येणार आहेत. (हेही वाचा: Maharashtra SSC & HSC Repeater Exams Result 2020: १० वी, १२ वी च्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर; mahresult.nic.in वर असे पहा तुमचे गुण)
दरम्यान, मुलांच्या सुरक्षेबाबत बीएमसी कोणतीही जोखीम पत्करू इच्छित नाही. यामुळेच मनपाने मुंबईतील सर्व शाळा 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी महापालिकेने 31 डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. अशा परिस्थितीत गुरुवारपासून शाळा सुरू होतील अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा होती, परंतु आज बीएमसीने ही मुदत वाढवून 15 जानेवारी केली आहे.