Dussehra 2019: 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकर यांच्याकडून दसऱ्याच्या शुभेच्छा, हवाई दलाच्या कार्यक्रमालाही लावली उपस्थिती
सचिन तेंडुलकर ( फोटो: Facebook/ANI)

भारतात दसऱ्याचा सण (Dussehra 2019) मोठ्या आनंदात साजरा केला जातो. या दिवशी परस्परांना आपट्याची पाने देऊन शुभेच्छा दिल्या जातात. या निमित्ताने सोशल मीडियावरही (Social Media) दसऱ्याच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यातच भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनीही ट्विटरच्या माध्यमातून क्रिकेट चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर गाझियाबाद (Ghaziabad) येथे पार पडलेल्या भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force) कार्यक्रमात त्यांनी उपस्थितीही दाखवली आहे.

भारतात तसेच महाराष्ट्रात आज दसऱ्याच्या निमित्ताने आनंद वाटला जात आहे. दरम्यान, सचिन तेंडुलकर यांनी त्यांच्या ट्विटरच्या अधिकृत खात्यावरुन भारतीयांना दसऱ्याच्या शुभेच्छांची एक पोस्ट केली आहे. यात ते म्हणाले की, सर्वांना दशहरा शुभेच्छा. हा सण आपल्या आयुष्यात उत्तम आरोग्य, आनंद आणि यश आणो. दसऱ्याच्यासह आज हवाई दल दिन देखील साजरा केला जात आहे. गाझियाबाद येथील हिंडन एअरबेस येथे हवाई दल दिन साजरा करण्यात येत आहे. यावेळी हवाई दलाची विमान आकाशात आपली शक्ती दर्शवित आहेत. मंगळवारी हवाई दल प्रमुख, लष्करप्रमुखांसह अनेक अतिथींनी या ठिकाणी हजेरी लावली. या कार्यक्रमात भारताचे माजी क्रिकेटर आणि हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन सचिन तेंडुलकरही उपस्थित होते. हे देखील वाचा- 'माझ्या कारकिर्दितील पहिला कसोटी सामना होता खास, दक्षिण अफ्रिका संघावर विजय मिळवल्यानंतर रोहित शर्मा याची प्रतिक्रिया.

ट्वीट-

 

सचिन तेंडुलकर यांनी काही तासांपूर्वी अजिंक्य राहाणे याचे पिता झाल्यामुळे अभिनंदन केले आहे. सचिन यांनी ट्विटरवर रहाणे यांचे अभिनंदन करत लिहिले की, "राधिका आणि रहाणे यांचे अनेक अभिनंदन. वडील होण्याचा आनंद अतुलनीय आहे. आता नाईटवॉचमनची नवीन भूमिका साकार आणि रात्री बेबी डायपर बदला." असे गंमतीशीर ट्विट केले आहे.