DRDO’s 2DG Anti-Covid Drug Price: देशातील प्रथम अँटी-कोविड ओरल ड्रग 2-डीजीची किंमत निश्चित, 'या' दिवशी होणार बाजाराच उपलब्ध
DRDO (Photo Credit: File Photo)

डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने विकसित केलेले देशातील प्रथम कोविड ओरल ड्रग 2- डीजीची (2DG Anti-Covid Drug) किंमत निश्चित केली गेली आहे. कोविड प्रतिबंध या औषधाची किमंत 990 इतकी ठरवण्यात आली आहे. दरम्यान, 2- डीजी औषध सरकारी रुग्णालय, केंद्र आणि राज्य सरकारांना कमी दरात दिली जाणार आहे. हे औषध पावडरच्या स्वरूपात पुढील महिन्यापासून बाजारात उपलब्ध होणार आहे. पाण्यात विरघळणारी ही 2-डीजी औषध देशाला कोविडच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे.

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते देशातील पहिली एंटी कोविड ओरल ड्रग 2- डीजी 17 मे ला डीआरडीओ भवन येथे लॉन्च करण्यात आली होती. या औषधाची पहिली खेप केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे सोपवली होती. डीआरडीओने हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लैबोरेटरीज येथे कविड प्रतिबंध 2-डीजी विकसित केली आहे. या औषधाला 2-डिऑक्सी-डी-ग्लूकोज नाव देण्यात आले असून याचा क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाले आहे. हे देखील वाचा- नागरिकांना प्रत्येक 6 महिन्यात कोरोनाच्या लसीचा बूस्टर डोस घ्यावा लागणार? सरकारने दिले 'हे' उत्तर

क्लिनिकल चाचण्या दरम्यान, हे औषध 110 कोविड रूग्णांना देण्यात आले होते. त्यापैकी बर्‍याच जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. तसेच ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांवरही हे औषध परिणात्मक ठरले आहे. वैद्यकीय चाचणी दरम्यान हे उघड झाले की 2-जी औषध कोविड रुग्णांना लवकर बरे होण्यास मदत करते. म्हणूनच ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) गंभीर कोविड रूग्णांसाठी 1 मे रोजी या औषधाच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत एप्रिल 2020 मध्ये या औषधाच्या चाचणीचा पहिला टप्पा सुरू झाला. त्यानंतर तपासणीत असे आढळले की हे औषध संक्रमित पेशींमध्ये जमा होते आणि विषाणू शरीरात फिरण्यापासून थांबवते. या निकालांच्या आधारे, डीसीजीआयने दुसर्‍या टप्प्यात म्हणजेच मे 2020 मध्ये क्लिनिकल चाचणीला परवानगी दिली आहे. मे ते ऑक्टोबर 2020 दरम्यान घेण्यात आलेल्या चाचण्यांच्या पुढच्या टप्प्यात औषधही सुरक्षित आढळले आणि कोविड रुग्णांच्या पुनर्प्राप्तीमध्ये वेगवान सुधारणा दर्शविली आहे. डीसीजीआयने नोव्हेंबर 2020 मध्ये तिसऱ्या टप्प्यात क्लिनिकल चाचण्यांना परवानगी दिली आहे. या कालावधीत दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडूमधील 27 कोविड रुग्णालयात 220 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

कोरोना प्रितिबंध औषध 2-डीजीच्या पाउचची किंमत 990 रुपये निश्चित केली गेली आहे. या औषधाच्या 10 हजार पाउचची दुसरी बॅच गुरुवारी निर्माते कंपनी डॉ. रेड्डीज लॅबने प्रसिद्ध केली आहे. या औषधांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन पुढील महिन्यापासून बाजारात उपलब्ध होईल जे कोविड संकटाच्या वेळी देशातील आरोग्याच्या पायाभूत सुविधांवरील ओझे दूर करेल. या औषधाची उपलब्धता वाढविण्यासाठी डॉ. रेड्डी यांच्या प्रयोगशाळांवर बारकाईने काम केले जात आहे.