Dog (Representational Image; Photo Credit: Pixabay)

Dog Attack in Lucknow:  कुत्रा हल्ल्यांची आणखी एक घटना समोर आली आहे. लखनौउ राज्यातील बलगंज परिसरात रविवारी सकाळी 63 वर्षीय वृध्द व्यक्तीला कुत्रा चावला असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षांपासून ह्या संदर्भात अनेक घटना घडल्याचे समोर येत आहे. पीडित राजेंद्र कुमार याने लखनौउ महानगरपालिका येथे तक्रार नोंदवली आहे. पीडित राजेंद्र कुमार हे रस्तोगिनगर येथील रहिवासी आहेत. रविवारच्या सकाळी ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

राजेंद्र कुमार हे रविवारी सकाळी दळण आणायला जात असतानाच त्यांच्या पायाला कुत्रा चावला असल्याचे समोर आले आहे. सुदैवाने त्यांना गंभीर जखमा झाल्या नाहीत. जीन्स घातल्यामुळे त्यांना गंभीर जखमा झाल्या नाही.

रस्त्यावरून जाताना कुत्र्याने अचानक माझ्यावर उडी घातली. मी जोरजोरात ओरडू लागलो तेव्हा तेथील स्थानिक लोक मला वाचवण्यासाठी धावत आले. कुत्रा हा भयंकर होता त्यामुळे तो हल्ला करत राहिला. जर स्थानिक लोक मदतीला आले नसते तर माझा जीव गेला असता.

शुभम पीडित व्यक्ती राजेद्र कुमार यांचा मुलगा त्याने सांगितले की,  कुत्र्याचा मालक तिथं उपस्थित असताना देखील त्याने कोणत्याही प्रकारचा मदत केली नाही. राजेंद्र यांना पायाला जखम झाली आहे त्याना बलराम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  त्यांच्यावर योग्य तो प्राथमिक उपचार चालू असल्याचे सांगितले आहे. त्यांना रेबिजचे वॅक्सीन देण्यात आले  आहे.

अॅनिमल वेलफेरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, जर मालका कडे त्या कुत्र्याचे परवाना नसेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाही करण्यात येईल.