Doctors remove a 16-kg tumor (PC - ANI)

Madhya Pradesh: मध्य प्रदेशच्या भोपाळमधील डॉक्टरांनी आश्चर्यकारक शस्त्रक्रिया केली आहे. ज्यामध्ये त्यांनी मुलीच्या पोटातून 16 किलोचा ट्यूमर (Tumor) यशस्वीरित्या काढून टाकला आहे. रविवारी भोपाळ येथील एका खासगी रुग्णालयात डॉक्टरांनी 20 वर्षाच्या मुलीच्या पोटातून 16 किलोचा ट्यूमर 6 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर काढून टाकला.

रुग्णालयाचे मॅनेजर देवेंद्र चंदोलिया यांनी सांगितले की, हा एक गर्भाशयाचा ट्यूमर होता. मात्र, आता मुलीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली. महिलेची प्रकृती आता स्थिर आहे. दोन दिवसांपूर्वी ही मुलगी राजगडहून आली होती. त्यावेळी तिची ट्यूमरची गाठ खूप मोठी होती. या महिलेला खाताना आणि चालताना प्रचंड त्रास होत होता. याला गर्भाशयाचा कर्करोग (Ovarian Cancer) म्हणून ओळखला जातो. या महिलेचे वजन 48 किलो आणि ट्यूमरचे वजन 16 किलो होते. ही एक मोठी शस्त्रक्रिया होती, असंही चंदोलिया यांनी सांगितलं. (वाचा - बेंगलुरू येथील डॉक्टरांनी 15 वर्षाच्या मुलीच्या गळ्यातून काढला 3.5 किलोचा ट्यूमर)

चंदोलिया यांनी पुढे बोलताना सांगितलं की, जर वेळेत ट्यूमर काढला नसता तर ही शस्त्रक्रिया होण्याची शक्यता कमी होती. ही शस्त्रक्रिया सुमारे सहा तास चालली. मुलगी आता धोक्याच्या बाहेर आहे.