Vijayakanth Passes Away: DMDK चे संस्थापक, तमिळ अभिनेते कॅप्टन विजयकांत यांचे निधन; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
Actor Vijayakanth, PM Modi (PC - Twitter, Facebook)

Vijayakanth Passes Away: डीएमडीकेचे संस्थापक कॅप्टन विजयकांत (Vijayakanth) यांचे गुरुवारी, 28 डिसेंबर रोजी चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. न्यूमोनियाची (Pneumonia) लागण झाल्याने त्यांना वेंटिलेटर सपोर्टवर (Ventilatory Support) ठेवण्यात आलं होतं. अहवालानुसार, त्याची कोविड-19 साठी चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. विजयकांत हे तमिळ चित्रपटांमध्ये काम करणारे लोकप्रिय अभिनेते होते.

कॅप्टन विजयकांत यांच्या निधनानंतर पीएम मोदींनी X वरील त्यांच्या पोस्टमध्ये राजकीय नेते आणि अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. 'थिरू विजयकांत जी यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले. तमिळ चित्रपट जगतातील एक आख्यायिका, त्यांच्या करिष्माई अभिनयाने लाखो लोकांच्या हृदयावर कब्जा केला. एक राजकीय नेता म्हणून, ते सार्वजनिक सेवेसाठी अत्यंत कटिबद्ध होते, ज्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणावर कायमचा प्रभाव पडला. त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे जी भरून काढणे कठीण आहे. ते एक जवळचे मित्र होते. मला त्यांच्याशी गेल्या अनेक वर्षांमध्ये केलेला संवाद आठवतो. या दुःखाच्या प्रसंगी माझे विचार त्यांच्या कुटुंबीयांसह, चाहते आणि असंख्य अनुयायांसह आहेत. ओम शांती.', अशा सद्भभावना पीएम मोदींनी X वरील त्यांच्या पोस्टमध्ये व्यक्त केल्या आहेत. (हेही वाचा -Sajid Khan Passes Away: ज्येष्ठ अभिनेते साजिद खान यांचे निधन; Mother India, Maya, The Singing Filipina सारख्या चित्रपटांमध्ये केले होते काम)

राहुल गांधींनी वाहिली श्रद्धांजली -

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीदेखील अभिनेत्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "डीएमडीकेचे संस्थापक, थिरू विजयकांत जी यांच्या निधनाने खूप दु:ख झाले आहे. चित्रपट आणि राजकारणातील त्यांच्या योगदानाने लाखो लोकांच्या हृदयावर अमिट छाप सोडली आहे. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांसाठी माझे मनःपूर्वक संवेदना."

दरम्यान, विजयकांत यांच्या निधनानंतर चेन्नईतील त्यांच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी होत असल्याचे व्हिज्युअल्स समोर आले आहेत. तथापी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी डीएमडीकेच्या नेत्यावर पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.