Sajid Khan Passes Away: हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता साजिद खान यांचे निधन झाले आहे. साजिद खान यांनी मेहबूब खानच्या ‘मदर इंडिया’ चित्रपटात सुनील दत्तच्या बिरजूच्या बालपणीची भूमिका साकारली होती. साजिद खान यांनी नंतर 'माया' आणि 'द सिंगिंग फिलिपिना' सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांमधून आपली छाप पाडली. आता कर्करोगामुळे वयाच्या 70 व्या वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. साजिद खान यांचा मुलगा समीर याने पीटीआयला सांगितले की, ते काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. 22 डिसेंबर (शुक्रवार) रोजी त्यांचे निधन झाले. समीरने सांगितले की, त्यांचे वडील दुसऱ्या पत्नीसोबत केरळमध्ये राहत होते. ते काही काळ चित्रपट जगतापासून दूर राहून लोकांच्या कल्याणासाठी काम करत होते.

साजिद खान यांना केरळमधील अलप्पुझा येथील कायमकुलम टाऊन जुमा मशिदीत दफन करण्यात आले. त्यांना मदर इंडियासाठी ऑस्करसाठीही नामांकन मिळाले होते. याशिवाय अमेरिकन टीव्ही शो 'द बिग व्हॅली'च्या एका एपिसोडमध्येही त्यांनी हजेरी लावली होती. याशिवाय ते 'इट्स हॅपनिंग' या म्युझिक शोमध्ये पाहुण्या जजच्या भूमिकेत दिसले होते. (हेही वाचा: Lee Sun-Kyun Found Dead: ऑस्कर विजेता 'पॅरासाइट' अभिनेता ली सन-क्युन यांचे निधन, कारमध्ये आढळला मृतदेह)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)