Arvind Kejriwal (File Image)

CM Kejriwal Announced Diwali Bonus: दिवाळीपूर्वी दिल्ली सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट (Diwali Bonus) दिली आहे. सरकारने यावेळी कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Kejriwal) यांनी सरकार दिवाळीला ग्रुप बी आणि सी कर्मचाऱ्यांना बोनस देणार असल्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात बोलताना केजरीवाल म्हणाले की, दिल्ली सरकारचे सर्व कर्मचारी माझे कुटुंब आहेत. सणांच्या या महिन्यात आम्ही दिल्ली सरकारी कर्मचाऱ्यांना 7 हजारांचा बोनस जाहीर केला आहे.

मुख्यमंत्री केजरीवाल पुढे बोलताना म्हणाले की, दिवाळीचा हंगाम सुरू आहे. दिल्ली सरकारच्या सर्व ग्रुप बी आणि सी ग्रेड कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा सरकारने केली आहे. दिल्ली सरकारच्या 80 हजार कर्मचाऱ्यांना बोनस दिला जाणार आहे. ज्यासाठी 56 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा बोनस देण्यासाठी 56,000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. (हेही वाचा -उत्तर प्रदेशात हवेच्या गुणवत्तेची पातळी खालावली; धुक्यात विरला Taj Mahal चा नजारा !)

यापूर्वी दिल्ली सरकारने महामंडळाच्या पाच हजार कर्मचाऱ्यांना बोनस दिला होता. महामंडळाच्या सफाई कर्मचाऱ्यांना सरकारने दिवाळीपूर्वी भेटवस्तू दिल्या. पाच हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात आले असून 3100 डीबीसी कर्मचाऱ्यांना मल्टी टास्क स्टाफ (एमटीएस) करण्यात आले आहे.

याशिवाय स्वच्छता यंत्रणा बळकट करण्यासाठी आणि कचऱ्याचे ढिग हटवण्यासाठी समांतर एजन्सी स्थापन करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. हे सर्व प्रस्ताव मंगळवारी सभागृहात मंजूर करण्यात आले. स्थायी समिती स्थापन झाल्यानंतर हे प्रस्ताव पुढे नेले जातील, असे महापौरांनी सांगितले.