दिवाळी निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. समाजातील विघातक प्रवृत्तींचा नाश होण्याची गरज त्यांनी यानिमित्ताने जारी केलेल्या चित्रफितीत व्यक्त केली. देशातील नागरिकांना शुभेच्छा देताना पंतप्रधान म्हणाले की, "देशातील जनेतेला दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर मनापासून शुभेच्छा. दिवाळीच्या निमित्ताने सर्वांच्या जीवनात यशस्वी प्रकाश पडावा. तसेच भारत देश नेहमी आनंदीत आणि सुखी राहो", अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. नरेंद्र मोदी यांच्यासह नामनाथ कोविंद, यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचाही समावेश आहे.
नरेंद्र मोदी यांचे ट्विट-
On Infantry Day, greetings to our valorous infantrymen. Our infantry personifies diligence and bravery. Every Indian is grateful to our infantry for their outstanding service.
— Narendra Modi (@narendramodi) October 27, 2019
रामनाथ कोविंद यांचे ट्विट-
Greetings and best wishes to fellow citizens on the auspicious occasion of Deepawali.
Let us on this day try to bring happiness in the lives of those who are less fortunate and needy by lighting the lamp of love, care and sharing #PresidentKovind
— President of India (@rashtrapatibhvn) October 27, 2019
राज ठाकरे यांचे ट्विट-
#दिवाळी #HappyDiwali pic.twitter.com/xfcVEohX7w
— Raj Thackeray (@RajThackeray) October 27, 2019
शरद पवार यांचे ट्विट-
ही दीपावली आपल्या जीवनात आनंद आणि समाधानाचा चिरस्थायी प्रकाश घेऊन येवो ही मंगलमय शुभकामना... सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!! #शुभदीपावली #HappyDiwali2019 #Diwali pic.twitter.com/ratGBIg09v
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 27, 2019
अजित पवार यांचे ट्वीट-
सर्वांना 'दीपावली' आणि 'नरक चतुर्दशी'च्या हार्दिक शुभेच्छा! ही दिवाळी आपणासाठी सुख-समृद्धी, समाधानाची जावो, जीवन तेजोमय होवो, अशा शुभेच्छा देतो.#HappyDeepavali pic.twitter.com/xNg9rRscjs
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 27, 2019
धनंजय मुंडे यांचे ट्विट-
अनंत दिवे अनंत ज्योती
उंबऱ्यावरची हसरी पणती
आली दिवाळी पुन्हा नव्याने
आनंदाला उधाण भरती
दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा!#HappyDiwali2019 #HappyDeepavali #Deepotsav2019 #Deepavali pic.twitter.com/FakwkvCABT
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 27, 2019