प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: Unsplash)

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) रॉकेट (Rocket) आणि मोठ्या प्रदुषित फटक्यांवर ( Polluted Crackers) बंदी घालण्यात आली आहे. यंदाच्या दिवाळीत (Diwali 2019) केवळ अनार (Anar) आणि फुलबाजा (Phuljhari) अशा 2 प्रकारच्या फटाक्यांना कायदेशीर परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे या वर्षीची दिवाळी शांत पार पडणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. या फटाक्यांवर अधिकृत शिक्का लावला जाणार आहे. ग्राहकांनी शिक्का पाहूनच बाजारातून फटाके खरेदी करावे, असे अवाहन पोलिसांनी केले आहे. बाजारात अनार आणि फुलबाजा हे फटाके दोन रंगात उपलब्ध होणार आहेत. अनार बॉक्स 50 रुपये तर, फुलबाजा फटक्यांची किंमत 250 रुपयापर्यंत असणार आहे. या फटाक्यांना ग्रीन क्रॅकर्स असेही म्हटले जात आहे.

बाजरातील फटाक्यांमुळे प्रदुषण वाढत आहे. यासाठी सरकारने ग्रीन फटाक्यांची निर्मिती केली आहे. यामुळे हवेतील 30 टक्के प्रदुषण कमी होईल, असे केंद्रीय पर्यावरण मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यावेळी सांगितले होते. प्रत्येक दिवाळीत प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेने हा प्रकल्प हाती घेतला होता. यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून कमी उत्सर्जन पातळी असलेल्या फटाक्यांशिवाय इतर कोणताही परवानगी दिली जाणार नाही, असा आदेश देण्यात आला. दिवाळीत किंवा इतर कार्यक्रमात फटाके फोडायाला परवानगी द्या, अशी याचिका दाखल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत . हे देखील वाचा- Diwali 2019: दिवाळीला घरात बनवा ‘सुगंधी’ आणि ‘आयुर्वेदिक’ उटणं

दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते एम.एस. रंधावा म्हणाले, फक्त ग्रीन फटाक्यांना परवानगी देण्यात आली आहे. बेकायदेशीर फटाक्यांच्या विक्रेत्यांना शोधण्यासाठी पथकांची स्थापना केली आहे. जर कोणी इतर प्रकारचे फटाके विक्री करताना आढळले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते एम. रंधावा म्हणाले आहेत