प्रतिकात्मक प्रतिमा File Image

Delhi Shocker: दिल्लीतील शास्त्री पार्क परिसरात एका 21 वर्षीय तरुणाला दुसऱ्या व्यक्तीच्या पत्नीसोबत पकडल्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. पीडित ऋतिक वर्माला आरोपीच्या पत्नीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. पोलिस उपायुक्त (उत्तर-पूर्व) राकेश पावरिया यांनी सांगितले की, "सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तरुणाला त्याच्या घरात पकडण्यात आले, तेव्हा तिच्या पतीने संतप्त होऊन पत्नी आणि ऋतिक वर्माला मारहाण केली." मृताचे नातेवाईक बंटीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी हृतिकला बेदम मारहाण केली. हे देखील वाचा: Cold Wave Alert: थंडीचा कडाका वाढला, भारतातील अनेक भागात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता 

बंटी म्हणाला, “त्यांनी हृतिकची नखेही काढली आणि त्याचा छळ केला. त्याच्या शरीराच्या प्रत्येक भागावर जखमा होत्या.'' या संदर्भात एका शेजाऱ्याने सांगितले की, आरोपीने हृतिक आणि महिलेवर हल्ला केला. शेजाऱ्याने सांगितले की, हृतिक टेम्पो चालवायचा. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.