Delhi Accident: दिल्ली रस्ता अपघातात एकाचा मृत्यू, तर 1 जण गंभीर जखमी
Accident (PC - File Photo)

Delhi Accident: राजस्थान येथे रस्ता अपघातात पाच पोलिस अधिकाऱ्यांचा अपघातात मृत्यू झाला ही घटना ताजी असताना दिल्लीत रविवारी अज्ञात वाहनाच्या धडकेत 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे अशी माहिती पोलिसांनी अधिकाऱ्यांनी दिली आहे. रविवारी ही घटना ५.३८ वाजता पोलिस ठाण्यात अपघाताची माहिती मिळाली. एका ऑटोरिक्षाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत रविवारी अज्ञात वाहनाची एका ऑटोरिक्षाला धडक लागली.पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी पोहचले. यात दोन जण जखमी झाले. आणि एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. जखमी लोकांना जेसीपी रुग्णालयात नेण्यात आले तेथून त्यांना जीटीबी रुग्णालात नेण्यात आले.

पोलिस उपायुक्त (ईशान्य) जॉय तिर्की म्हणाले, "ऑटो-रिक्षाचा चालक, कर्दमपुरी येथील रहिवासी आहे त्यांचे नाव अक्रम असे ओळखले जाते, त्याला मृत घोषित करण्यात आले. दुसरा व्यक्ती बेशुद्ध आहे. त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे " डीसीपी म्हणाले, "परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. अपघाताचे कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत."

दरम्यान, दिल्लीत केएन काटजू मार्ग पोलीस स्टेशन हद्दीतील रोहिणी सेक्टर 15 मध्ये डीटीसी इलेक्ट्रिक बस उलटली, अपघातात तीन जण जखमी झाले