Delhi News: अंघोळीसाठी कालव्यात गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू, दिल्लीतील घटना
Delhi Shocker: PC TWITTER

Delhi News: दिल्ली येथील रोहिणी परिसरातील कालव्यात अंघोळीसाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. कालव्यातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही घटना घडली. बुधवारी दुपारी तीन मुले आपल्या घरातून निघाले होते. परंतु बराच वेळ घरी परतले नाही त्यामुळे पालकांनी मुलांचा शोध घेतला त्यावेळीस मुले कालव्यात बुडाली असं समजले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. घटनास्थळी बचाव कार्य सुरु झाले. (हेही वाचा- डेहराडूनमध्ये 30 वर्षीय आत्याचे 16 वर्षांच्या भाच्यासोबत लैंगिक संबंध

मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी पोलिस दल आणि  अग्निशमन दल बचाव कार्यासाठी पोहचले. हा कालवा शहरातील हैदरपूर जलशुद्धीकरण केंद्राजवळील आहे. बुधवारी दुपारी तीन वाजता मुले घरातून निघाले होते.  परंतु ते घरी पोहचले नाही त्यामुळे पालकांनी गावात शोधाशोध घेतली. बराच वेळानंतर गावकऱ्यांनी कालव्याजवळ शोध घेतला त्यानंतर मुलं कालव्यात बुडाली अशी माहिती समोर आली. गावकऱ्यांनी पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. बचावर कार्य सुरु झाले  पंरतु एकही मुले वाचले नाही.

तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तिघांचे मृतदेह अग्निशमन जवानांनी बाहेर काढले आहे. तिघांचे मृतदेह रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर गावात दुखाचे सावट पसरले आहे. तिघेही मित्र भालसावा गावातील रहिवासी होते.