Delhi Election 2020: महाराष्ट्र, झारखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थाननंतर भाजपला दिल्लीतही झटका बसण्याची शक्यता; जाणून घ्या सविस्तर
बीजेपी (Photo Credits: IANS)

दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी (Delhi Election 2020) मतदान संपल्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. गेल्या 10 वर्षांपासून दिल्लीत आम आदमी पक्षाची (AAP) सत्ता असून या निवडणुकीतही आपचे सरकार येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकूण 70 जागांपैकी आम आदमी पक्षाला 2015 सालच्या निवडणुकीत 67 जागा मिळाल्या होत्या. आता मात्र त्या जागा कमी झाल्याचे दिसत आहेत. भारतीय जनता पक्षाला (BJP) गेल्या विधानसभा निवडणुकीत 3 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्या जागा वाढू शकतील, असे एक्झिट पोलचे आकडेवारी सांगत आहेत.

केंद्रात भाजपचे सरकार असले तरीदेखील अनेक राज्यात भाजप संघर्ष करत असताना दिसत आहे. महाराष्ट्र, झारखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थाननंतर भाजपला दिल्लीतही झटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र् विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 105 जागा मिळवल्या होत्या. परंतु, बहुमत सिद्ध करण्यास असमर्थ ठरल्यास भाजपला सत्तेपासून वंचित राहावे लागले आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून भाजपची नामुष्की झाली होती. याचाच फटका भाजपला इतर राज्यातही बसू लागला आहे. भाजपला महाराष्ट्रासह कोणकोणत्या राज्यात धक्का बसला आहे, हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती फायदेशीर ठरणार आहे. हे देखील वाचा- Delhi Assembly Election All Exit Poll Results 2020: दिल्ली विधानसभा निवडणूक एक्झिट पोल्स अंदाज; भाजपला धक्का, AAP आघाडीवर, घ्या जाणून

 

महाराष्ट्र-

एकूण जागा- 288

भाजप- 105

शिवसेना- 56

काँग्रेस- 44

राष्ट्रवादी- 54

मनसे-1

इतर- 28

झारखंड-

एकूण जागा- 81

एमएम - 30

भाजप- 25

काँग्रेस- 16

जेव्हीएम- 3

एजेएसयूपी- 2

आरजेडी- 1

इतर- 04

मध्यप्रदेश-

एकूण जागा- 230

काँग्रेस- 114

भाजप- 109

बीएसपी- 2

इतर- 05

छत्तीसगड-

एकूण जागा- 90

काँग्रेस- 68

भाजप-15

बीएसपी-17

इतर- 0

राज्यस्थान-

एकूण जागा- 200

काँग्रेस- 100

भाजप- 73

बीएसपी- 20

इतर- 06

दिल्ली विधानसभा निवडणुक पार पडल्यानंतर एक्झिट पोलचा अंदाज येऊ लागला आहे. सध्या दिल्लीमध्ये आपचे सरकार असून दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 मध्येही आम आदमी पक्षच बाजी मारणार असे राजकीय वातावरण निर्माण झाले आहेत. एबीपी माझाच्या एक्झिट पोलनुसार, आम आदमी पक्षाला 49- 63 आणि भाजपला 5- 19 तर, काँग्रेसला 0- 04 जागा मिळणार असल्याचे अंदाज लावला जात आहे.