Delhi Assembly Election Exit Poll Results 2020: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर विविध संस्था, प्रसारमाध्यम समूह यांनी केलेल्या मतदानपूर्व चाचण्याचे अंदाज म्हणजेच एक्झिट पोल्स रिजल्ट जाहीर झाले आहेत. एबीपी, आज तक, नेल्सन आदी संस्थांनी केलेल्या एक्झिट पोल्सचे अंदाज जाहीर झाले आहेत. काही एक्झिट पोल्सनी अरविंद केजरीवाल यांच्या एक्झिट पोल्सला दिल्लीच्या जनतेचा कौल असल्याचे म्हटले आहे. तर, काही पोल्समध्ये भाजपचा भाव वधारताना दाखवला आहे. काँग्रेसही राजधानी दिल्लीमध्ये बऱ्यापैकी कामगिरी करताना दाखवले आहे. कोणत्या एक्झिट पोल्सने कोणत्या पक्षाला किती जागा दिल्या घ्या जाणून.
एबीपी माझा (एबीपी न्यूज सी वोटर) एक्झिट पोल
आम आदमी पक्ष (AAP) - 49 ते 63 जागा
भारतीय जनात पक्ष (BJP) - 05 ते 19 जागा
राष्ट्रीय काँग्रेस पक्ष - (Congress) - शून्य ते 4 जागा
आज तक (इंडिया टुडे-एक्सीस) एक्झिट पोल
आम आदमी पक्ष (AAP) - 34
भारतीय जनात पक्ष (BJP) -
राष्ट्रीय काँग्रेस पक्ष - (Congress) -
सुदर्शन न्यूज एक्झिट पोल
आम आदमी पक्ष (AAP) - 40-45 जागा
भारतीय जनात पक्ष (BJP) - 24-28 जागा
राष्ट्रीय काँग्रेस पक्ष - (Congress) -2-3 जागा
NewsX- नेता एक्झिट पोल
आम आदमी पक्ष (AAP) - 53-57 जागा
भारतीय जनात पक्ष (BJP) - 11-17 जागा
राष्ट्रीय काँग्रेस पक्ष - (Congress) - 0-2 जागा
टाइम्स नाउ इप्सॉस एक्झिट पोल
आम आदमी पक्ष (AAP) - 44 जागा
भारतीय जनात पक्ष (BJP) - 26 जागा
राष्ट्रीय काँग्रेस पक्ष - (Congress) - 0 जागा
इंडिया टुडे एक्सिस पोल एक्झिट पोल
आम आदमी पक्ष (AAP) - 44 जागा
भारतीय जनात पक्ष (BJP) - 26 जागा
राष्ट्रीय काँग्रेस पक्ष - (Congress) - 0 जागा
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज (8 फेब्रुवारी 2020) मतदान पार पडले. मतदानास सुरुवात झाली तेव्हा कडाक्याच्या थंडीमुळे सकाळी मतदानाचा वेग काहीसा मंदावला होता. मात्र, दुपारी सुर्य जसा माथ्यावर येऊ लागला. तशी मतदानासाठी बाहेर पडणाऱ्या मतदारांची संख्या वाढली. त्याचा परीणाम सकाळी रेंगाळलेला मतदानाचा टप्पा वाढण्यात झाला. दुपारी 2 वाजेपर्यंत सुमारे 28.14 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावाला. दरम्यान दिवसभरात एकूण किती टक्के मतदान झाले याची आकडेवारी अद्याप प्राप्त होऊ शकली नाही. दरम्यान, दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मोठ्या कडेकोट बंदोबस्तात आज सकाळी आठ वाजता मतदानास सुरुवात झाली. हे मतदान सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहिले. दिल्लीमध्ये या वेळी सुमारे 47 लाख 86 हजार मतदार आहेत. या मतदानाची मतमोजणी 11 फेब्रुवारी या दिवशी होणार आहे.