Delhi Crime: दिल्लीत दारू पिऊन तीन जणांनी मित्रावर केला जीवघेणा हल्ला, धक्कादायक व्हिडिओ समोर
delhi Crime PC Twitter

Delhi Crime: दिल्लीत शास्त्री पार्कमध्ये तीन जणांची एका व्यक्तीवर चाकूने जीवघेणा हल्ला केला त्यानंतर त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेचा व्हिडिओ जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सलीम, सौद, बिलाल आणि फिरोज अशी या आरोपींची नावे आहेत. 25 वर्षीय समीर अहमद असे पीडित तरुणाचे नाव आहे. हल्ल्यानंतर लगेचच, स्थानिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. ( हेही वाचा- क्रुरतेची हद्दपार, कुत्र्यांच्या पिल्लांना कारमध्ये डांबून ठेवले)

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, तीन हल्लेखोर एका व्यक्तीचा पाठलाग करत चाकू भोसकताना दिसत आहे. सपासाप पीडीत व्यक्तीच्या अंगावर वार करत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर एका आरोपीने बंदुकीने गोळी झाडली. हे भयंकर दृश्य समोर येत आहे. काही स्थानिक हा हल्ला थांबविण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे. आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याचे दिसत आहे. पोलिसांना स्थानिकांना माहिती देताच घटनास्थळी दाखल झाले. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर पीडित एका दुकानासमोर जखमी अवस्थेत पडलेला दिसला. त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

नेमकं कशावरून भांडण सुरु झालं हे अद्याप पोलिसांना समजले नाही. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.या घटनेनंतर शास्त्रीनगर मध्ये एकच खळबळ उडाली आहे.