Delhi Air Pollution: दिल्लीतील हवा प्रदूषणात वाढ; 'एअर क्वालिटी इंडेक्स' 350 च्या पार
Delhi Air Pollution (PC - File Image)

Delhi Air Pollution: दिल्लीमध्ये प्रदूषणाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून हवेची गुणवत्ता पातळी खालावत आहे. दिल्लीमध्ये आज म्हणजेच शुक्रवारी 'एअर क्वालिटी इंडेक्स' (Air Quality Index) 350 च्या पार आहे. त्यामुळे दिल्लीतील जनतेला श्वास घेणं अवघड झालं आहे. त्यामुळे दिल्ली प्रदूषणावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर नेहमी टीका केली जाते. (हेही वाचा - Delhi Air Pollution: दिल्लीमधील हवेची गुणवत्ता कमालीची घसरल्याने शाळा आणि कॉलेजेस 5 नोव्हेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा सरकारचा निर्णय)

सध्या दिल्ली व एनसीआर परिसरातील वातावरणात धुक्यासारखा प्रदूषित हवेचा पट्टा निर्माण झाला आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून दिल्लीमध्ये प्रदूषणाची पातळी वाढली आहे. दरम्यान, पंजाब, हरयाणातील शेतकऱ्यांकडून गव्हाच्या पिकाच्या पेंड्या जाळल्याने दिल्लीच्या प्रदूषणात वाढ होत असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले आहे. दिल्ललीकरांना प्रदूषणाचा धोका होऊ नये, यासाठी सरकारतर्फे मोफत मास्कही वाटण्यात आले.

एएनआय ट्विट - 

वाढत्या प्रदूषणाची समस्या लक्षात घेता दिल्लीमध्ये 4 नोव्हेंबरपासून दुचाकी वगळता सर्व वाहनांसाठी सम-विषम नियम लागू झाला आहे. येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत लागू केला जाणार आहे. दिल्लीमध्ये 1 नोव्हेंबरला एनसीआर मध्ये 'आरोग्य आणीबाणी'ची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आधिपत्याखाली येणाऱ्या पर्यावरण प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण मंडळाने बांधकामाच्या कार्यावर 5 नोव्हेंबर पर्यंत बंदी घातली होती. दिल्लीमध्ये 1 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.