मूकबधीर महिलेवर लष्कराच्या जवानांकडून 4 वर्षे सामूहिक बलात्कार
(संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

पुण्यातील लष्कराच्या 4 जवानांनी मुकबधीर महिलेवर 4 वर्षे सामूहिक बलात्कार करत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच या प्रकरणी 4 जवानांनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिला काही वर्षांपासून खडकी येथील लष्करी रुग्णालयात काम करते. तसेच ही पीडित महिला मूकबधीर आहे. गेल्या 4 वर्षांपासून या मूकबधीर पीडित महिलेवर लष्कराचे जवान सामूहिक बलात्कार करत होते. जुलै महिन्यामध्ये या पीडित महिलेचा एका स्वयंसेवी संस्थेशी संपर्क आला. त्यावेळी तिने आपल्या सोबत झालेल्या अत्याचाराची घटना या संस्थेतील तज्ञ्ज ज्ञानेंद्र पुरोहित यांना दिली. तसेच एका रात्री माझी रुग्णालयात रात्र पाळीचे काम सोपविण्यात आले होते. वेळेची संधी साधून या नराधामांनी मला जबरदस्तीने रुग्णालयाच्या बाथरुमध्ये नेऊन बलात्कार केल्याचे या पीडित महिलेने सांगितले आहे. तर या प्रकरणाची रुग्णालयाच्या वरिष्ठांकडे तक्रार करुन ही त्यांनी या घटनेमध्ये कानाडोळा केला.

या घटनेतील आरोपी जवानांनी पीडित महिलेच्या बलात्कार केल्याचा व्हिडीओसुद्धा रेकॉर्ड केला होता. तसेच तिला या जवानांनकडून शारीरिक संबंध न ठेवल्यास बलात्कार केल्याच्या व्हिडिओ व्हायरल करु अशी धमकी दिली जात होती. त्यामुळे या घटनेतील आरोपींवर खडकीतील लष्कराच्या न्यायालयाने चारही जणांची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.