Photo Credit- X

Dead Cockroach Found in Food: हॉटेल, ढाबे आणि ट्रेनमधील अन्नपदार्थांमध्ये मृत अळी आणि झुरळ (Dead Cockroach in Food) आढळण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. गाझियाबादमधील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये अशीच एक घटना घडली आहे. जिथे भोजनसाठी आलेल्या एका व्यक्तीच्या भाजीत (Food) एक मृत झुरळ आढळला. त्यानंतर संतापलेल्यया ग्राहकाने हॉटेलमध्ये गोंधळ घातला आणि कर्मचाऱ्यांना मालकाला फोन करण्यास सांगितला. जेवणात झुरळ आढळलेले हे हॉटेल मसुरीतील एक प्रसिद्ध हॉटेल असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या जेवणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Viral Video: आग्र्यात श्वाना सोबत क्रूरता! व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्राणी प्रेमींनी व्यक्त केली नाराजी, व्हिडीओ व्हायरल)

हॉटेलच्या भाजीत आढळला मृत झूरळ

व्हिडिओमध्ये ग्राहक वेटरला जाब विचारताना दिसतो. तसचे त्यांच्या या निष्काळजीपणामुळे लोकांचा जीव जाईल असे तो म्हणतो. हा व्हिडिओ X वर @helpasianfound1 या हँडलवरून सोशल मीडिया शेअर करण्यात आला आहे. त्याशिवाय, हे हॉटेल लायसन्सशिवाय सुरू असल्याची धक्कादायक माहितीदेखील समोर आली आहे. अशा निष्काळजी हॉटेल्सचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

वंदे भारत एक्स्प्रेसमधील घटना

नुकतेच काही दिवसांपूर्वी ट्रेन वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थात मृत झुरळ सापडले होते. विदित वार्शने नावाच्या एका एक्स वापरकर्त्याने प्रीमियम वंदे भारत ट्रेनमध्ये खराब अन्न मिळत असल्याची तक्रार सोशल मीडियावर जून 2024मध्ये पोस्ट केली होती. वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये दिल्या गेलेल्या अन्नामध्ये मृत झुरळे दिसत असल्याचा फोटो त्यांनी पोस्ट केला होता. त्यानंतर दोन दिवसांनी, आयआरसीटीसीने याबाबत माफी मागितली आणि संबंधित सेवा प्रदात्यावर ‘योग्य दंड’ आकारण्यात आला. आयआरसीटीसीने प्रवाशाच्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त केली होती.