Crime | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका दलित मुलाला लघवी पिण्यास भाग पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेअंतर्गत पोलिसांनी तीन आरोपींना अटक करण्यात आले आहे. 15 वर्षाच्या मुलाने आरोप केला की, बळजबरीने तिघांन्ही दारूच्या बाटलीत असलेले लघवी पिण्यास भाग पाडले. (हेही वाचा- आंध्र प्रदेशात एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाने आधी अल्पवयीन मुलीचा जीव घेतला आणि आता स्वत:ही केली आत्महत्या)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा सांस्कृतिक कार्यक्रमात साऊट सिस्टीमचे काम करतो. रात्रीचे काम संपवून अल्पवयीन मुलगा घरी जात होता. त्यावेळीस तिघांन्ही त्याला घेरलं आणि बळजबरीने दारूच्या बाटलीत असलेले मूत्र पिण्यास भाग पाडले. आरोपींनी पीडितेला मारहाण केली आणि त्याचा व्हिडिओ देखील शुट केला.  किशन तिवारी, सत्यम तिवारी आणि दिलीप मिश्रा असं तीन आरोपींचे नाव आहे. तिघे ही मद्यधुंद अवस्थेत होते. मुलाने घरी येऊन ही घटना आपल्या भावाला सांगितली.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी आईवडिलांनी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवला. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पीडितचे कुटुंब गावात डीजे चालवतात. गावात डिजे चालवत असताना ते जास्त शुल्क आकारतात. एका कार्यक्रमात जनरेट नसल्याचे कारण देत डीजे बंद केला होता. त्यामुळे गावातील मद्यधुंद तरुणांनी पूर्व वैमनस्यातून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.