Car ran over a puppy Video PC TWIITER

UP Crime: उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये एका कुत्र्याच्या पिल्ला जाणून बुजून उडवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेक प्राणी प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.  ही घटना शिवनगर परिसरात घडली. ही घटा ५ ऑक्टोबर (शनिवारी) घडली. (हेही वाचा- बस ड्रायव्हरकडून कुकीज घेण्यासाठी रोज बसची वाट पाहतो कुत्रा, हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल)

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, कुत्र्याचं पिल्ली रस्त्याच्या कडेला खेळत असताना एक कार अचानक समोरून येते आणि थेट पिल्ल्यांला उडवते. कारच्या धडकेत पिल्लू गंभीर जखमी झाले. तो वेदनेने तडफडत असताना त्याला झुडप्यात फेकले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या प्रकरणी आरोपी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दही पोलिसांनी सदर घटनेची दखल घेत आरोपीविरुद्ध कारवाई सुरू केली.

घटनेचा व्हिडिओ 

पोलिसांकडून गुन्हा दाखल 

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कार चालकावर संताप व्यक्त केला. तर काहींनी त्याच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. या घटनेची माहिती मिळताच, परिसरातून कार चालकावर निषेध व्यक्त केला जात आहे.