PM Modi at G20 Summit: दुसऱ्या महायुद्धानंतर संपूर्ण जग सर्वात मोठ्या आव्हानाचा सामना करत आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी
Narendra Modi (Photo Credit: ANI)

जी -20 (G20 Summit) ची दोन दिवसीय शिखर बैठक शनिवारी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही या परिषदेत उपस्थिती दर्शवली आहे. पीएम मोदी सौदी अरेबियाच्या सुलतान सलमान बिन अब्दुलाझीज अल सौद यांच्या आमंत्रणावरून या परिषदेत सहभागी झाले आहेत. सौदी अरेबियाच्या शाह सलमानने शनिवारी जी -20 शिखर परिषद सुरू केली आणि कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्याचे आवाहन केले. दरम्यान, दुसऱ्या महायुद्धानंतर संपूर्ण जगाला मोठ्या आव्हानाचा सामना करत आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. तसेच कला, तंत्रज्ञान, पारदर्शकता आणि विश्वास यावर आधारित नवीन जागतिक निर्देशांक विकसित करण्याची गरज त्यांनी सर्वांसमोर ठेवली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे या वेळी जी -20 शिखर परिषद आयोजित केली जात आहे, जिथे विविध देशांचे प्रमुख या परिषदेला ऑनलाईन नव्हे तर वैयक्तिकरित्या संबोधित करू शकतात. शाह सलमान आपल्या भाषणात म्हणाले की, "या आव्हानाविरोधात या परिषदेत एकत्रित येऊन आशेचा आणि आश्वासनाचा संदेश देणे आपले कर्तव्य आहे." सौदी अरेबिया यावर्षी जी-20 चे अध्यक्ष आहेत. या व्हर्च्युअल समिटचे आयोजन सौदी अरेबिया करीत आहेत, ज्यात अमेरिका, चीन, भारत, तुर्की, फ्रान्स, ब्रिटन, ब्राझील आणि इतर देशांसारख्या जगातील सर्वात समृद्ध आणि विकसनशील अर्थव्यवस्थेचे नेत्यांचा यात समावेश आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही या शिखर परिषदेला संबोधित करु शकतात. हे देखील वाचा- COVAXIN III Phase Test: कोवॅक्सिन लसीची तिसऱ्या टप्प्यात चाचणी यशस्वी झाल्यास 1 हजारपैकी 50 टक्के जणांना दिली जाणार

शाह सलमान म्हणाले की, "कोविड -19 साथीचा रोग हा एक अनपेक्षित धक्क्यासारखा आहे. ज्याने फारच कमी काळात संपूर्ण जगावर परिणाम केला आहे. जागतिक, आर्थिक आणि सामाजिक नुकसान केले आहे. " यावेळी, जी -20 च्या नेत्यांनी माहिती सामायिक करणे, संशोधनासाठी आवश्यक असलेली सामग्री सामायिक करणे, क्लिनिकल डेटा सामायिक करणे आणि आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचे वचन दिले आहे.

कोरोना संसर्गाविरूद्ध लस तयार करण्यासाठी निधी उभारण्यासाठी एकत्र काम करण्याचे देशांनी वचन दिले आहे. जी -20 च्या नेत्यांनी समन्वित पद्धतीने विकसनशील देशांना पाठिंबा देण्याचे आवाहनही शाह सलमान यांनी केले आहे.