UP Couple Suicide Case: हॉटेलच्या रुममध्ये जोडपे आढळले मृतावस्थेत, चौकशी सुरु, उत्तर प्रदेशातील खळबळजनक घटना
Couple Suicide at OYO Room: PC TW

UP Couple Suicide Case: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) संभलमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका हॉटेलच्या खोलीत जोडप्यांचा मृतदेह (Death) सापडला आहे. तरुणाचा मृतदेह छताला (Hanging) लटकलेल्या अवस्थेत आढळून आला तर तरुणी बेडवर बेशुध्द अवस्थेत पडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा-  पॉर्न व्हिडिओ पाहण्याचे व्यसन असलेल्या बापाची पोटच्या मुलीवर सेक्सची जबरदस्ती; नकार दिल्याने केली हत्या)

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील मोहल्ला फतेहुल्ला सराय येथील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. मृत तरुण दिल्लीच्या गौतम नगर येथील रहिवासी होता तर तरुणी संभल येथील रहिवासी होती. गुरुवारी दुपारी दोघे ही हॉटेलमध्ये पोहोचले. एक दिवसासाठी रुम हवी असं सांगत हॉटेल मॅनेजरला ओळखपत्र दाखवून रुम मिळवला.

शुक्रवारी चेक आऊट न केल्यामुळे हॉटेल मॅनेजर त्यांच्याकडे गेला.  खोलीचा दरवाजा ठोठावला. पण कोणीही प्रतिसाद न दिल्याने मॅनेजरला संशय आला. मॅनेजरने सहकारीसोबत त्याने पायऱ्या चढून खिडकीतून पाहिले तर खोलिच्या आत दोघे ही बेशुध्द अवस्थेत दिसले. या घटनेनंतर मॅनेजरने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तरुणाचा लनोंटकलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह खाली काढला. दोघांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा नोंदवून घेतला असून पुढील चौकशी सुरु केली.