कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे अवघा देश लॉकडाऊन (Lockdown ) करण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातील नागरिक घरातच स्थानबद्ध झाले आहेत. त्यामुळे या वेळात करायचे काय असा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री (Union Information and Broadcasting Minister) प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी मात्र हा प्रश्न सोडवला आहे. प्रकाश जावडेकर हे मिळालेल्या वेळेत दुपारी दूरदर्शन (Doordarshan) या सरकारी दुरचित्रवाणी वाहिणीवरुन पुन्हा प्रसारीत होणाऱ्या रामायण मालिकेचा अस्वाद घेणार आहेत. जावडेकर यांनी ट्विट द्वारे ही माहिती दिली आहे.
कोरोना व्हायरस जगभरात थैमान घालत आहे. जगभरातील देश या संकटाचा सामना करण्यासाठी मेटाकुटीला आले आहेत. अशात जगभरातील अनेक देशांनी अवघा देश लॉकडाऊन केला आहे. भारताचाही यात समावेश आहे. भारतातही लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे घरात बसण्याची फारशी सवय नसलेल्या भारतीयांना या फावल्या वेळात काय करायचे असा प्रश्न सतावतो आहे.
प्रकाश जावडेकर ट्विट
I am watching 'Ramayana' , are you?@DDNational @narendramodi @BJP4India @BJP4Maharashtra #StayHomeStaySafe #IndiaFightsCorona pic.twitter.com/8Uq3wbJ0e6
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) March 28, 2020
दूरदर्शन ट्विट
#Mahabharat on #Doordarshan!!
जनता की मांग पर लोकप्रिय धारावाहिक #महाभारत का पुनः प्रसारण आज से डीडी भारती पर शुरू किया जा रहा है
▪️ #DDBharati पर 'महाभारत' का पुनः प्रसारण दोपहर 12 बजे और शाम 7 बजे किया जाएगा pic.twitter.com/jiyWcrwe3i
— Doordarshan National (@DDNational) March 28, 2020
दरम्यान, अनेकांनी या वेळेचा सदुपयोग करत पुस्तक वाचन, युट्युब, नेटफिक्स यांवरील विविध व्हिडिओ, वेब सीरिज पाहात आहेत. काहींना मात्र या वेळेत काय करायचे हा प्रश्नच आहे. दरम्यान, नागरिकांची अवस्था ध्यानात घेऊन केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दूरदर्शनवर रामायण मालिका प्रसारीत करण्याचा निर्णय घेतला असावा.
लॉकडाऊन असल्यामुळे घरात अडकून पडलेल्या नागरिकांची अवस्था सोशल मीडियावर मोठ्या मजेशीरपणे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये काहींनी मिक्स केलेले फरसाण वेगळे करण्याचा आनंद घेतला आहे. कोणी कंगव्याचे दात मोजत आहे. काहींनी तर चक्क मारी बिस्किटमधील छिद्र, फ्रीज आणि घरातील विविध वस्तूंचे आकारमाण लांबी आणि रुंदी मोजली आहे. (हेही वाचा, 'रामायण' मालिकेचे पुर्नप्रक्षेपण उद्यापासून सुरु होणार- प्रकाश जावडेकर)
दरम्यान, राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने (Maharashtra Health Ministry) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज कोरोना व्हायरस बाधित नवे 6 रुग्ण आढळले. त्यातील 5 मुंबई शहरातील आहेत तर, एक नागपूर येथील आहे. नव्या रुग्णांची भर पडल्यानंर राज्यातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 159 इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची एकूण संख्या 873 इतकी आहे. त्यातील 79 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरीत 775 रुग्णांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.