Coronavirus: Parle G कंपनीची मोठी घोषणा; आता अशाप्रकारे करणार गोर गरिबांना मदत

भारतात कोरोना बाधितांची (Coronavirus) संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशातून महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातच कोरोना व्हायरचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन (Lockdown) घोषीत केले आहे. आजपासून लॉकडाऊनला सुरुवाता झाली असून एप्रिल महिन्याच्या 14 तारखेपर्यंत नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. दरम्यान, हातावर पोट भरणाऱ्या लोकांचे सर्वाधित हाल होत आहे. यातच भारतातील प्रसिद्ध बिस्कीट कंपनी पार्ले जी (Parle G) ने अशा लोकांसाठी पुढाकार घेतला असून आजपासून 21 दिवसांत 3 कोटी बिस्किटच्या पॉकेट्सचा वाटप करणार असल्याचे माहिती पीटीआय वृत्तसंस्थेने दिली आहे. यामुळे गोर गरिबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोना व्हायरसने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. कोरोना व्हायरसची लागण होऊन भारतात आतापर्यंत १० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 600हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. यातच कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसाचा लॉकडाऊन घोषीत केला आहे. यामुळे सामान्य नागरिकांना याचा फटका बसला आहे. याशिवाय सकाळी कमवायचे आणि रात्री खायचे अशी उपजिविका असणाऱ्या नागरिकांना आता कशाप्रकारे जगायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. अशा गोर गरिबांच्या मदतीसाठी पार्लेजी कंपनी धाऊन आली आहे. पार्लेजी कंपनी ही पुढच्या तीन आढवड्यात तब्बल 3 कोटी बिस्किट पॉकेट्सचे वाटप करणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही गैरसोय होत असल्यास 'या' क्रमांकावर साधा संपर्क; ठाणे पोलिसांकडून नागरिकांना दिलासा

पीटीआयचे ट्वीट-

कोरोना व्हायरसने भारतातही धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. सुरुवातील केरळ येथे 3 कोरोना बाधीत रुग्ण आढळले होते. त्यानंतर भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येने 600 चा आकडा पार केला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 122 वर पोहोचली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज दुपारपर्यंत 116 होती. मात्र, मुंबईत 5 तर ठाण्यात 1 असे एकूण 6 नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. महाराष्ट्रात आज दिवसभरात 15 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.