Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारतात (India) कोरोना व्हायरसने (Coronavirus) कहर सुरूच ठेवला आहे. देशात सध्या लॉकडाउन (Lockdown) असूनही रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात एकूण कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढून 26,496 झाली आहे. यातील 20177 सक्रिय प्रकरणे आहेत आणि 5914 बरे झाले आहेत.  गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 1975 रुग्ण आढळले आहेत, जे आतापर्यंतचे सर्वात मोठे प्रकरण आहे. यावेळी 47 लोकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी जाहीर झालेल्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 824 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनामुळे आजवर 826 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र दिलासा देणारी बाब म्हणजे, 5914 रुग्ण या आजारावर विजय मिळविण्यात यशस्वी ठरले आहेत. देशातील कोरोनाचे वाढत्या प्रकरणांचा धोका लक्षात घेत लॉकडाउनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढविण्यात आले आहे. (Coronavirus Lockdown: कोविड-19 प्रभावित क्षेत्रात लॉकडाउन वाढीचे महाराष्ट्रा समवेत पाच राज्यांनी केले समर्थन)

महाराष्ट्रात (Maharashtra) आजवर सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्र्रात एकूण 7628 रुग्णांची नोंद झाली असून 6229 सक्रिय आहेत. राज्यात 323 लोकांचा मृत्यू झाला आहेत तर, 1076 लोकं बरे झाले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग चिंताजनक बाब असताना मुंबईत कोरोनामुळे 2 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 100 पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. या सर्वांमध्ये दिलासा देणारी बातमी म्हणजे मुंबईतील 31 पत्रकारांची कोरोना विषाणूची चाचणी नकारात्मक आली आहे, ज्यानंतर सर्वांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. या सर्वांना त्यांच्या घरी क्वारंटाइनमध्ये राहण्यास रागितले आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांत कोरोना संक्रमणाची 29 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. सर्व 29 प्रकरणे काश्मीर भागातून नोंदवली गेली आहेत. राज्यात संसर्ग झालेल्यांची संख्या आता 523 वर पोहोचली आहे, त्यापैकी 466 काश्मीर खोऱ्यात आणि 57 जम्मू प्रदेशात आहेत. जम्मू काश्मीरच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने ही माहिती दिली.