Coronavirus Outbreak | Photo Credits: IANS

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातला आहेत. महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. तबलिगी जमातने दिल्ली येथील निजामुद्दीन परिसरात पार पाडलेल्या कार्यक्रमामुळे या संख्येत अधिक भर पडली आहे. यातच पुणे (Pune) येथे निजामुद्दीहून परतलेल्या एका कोरोनाबाधित रुग्णाच्या वाहनाला अपघात झाला. त्यावर उपचार करण्यासाठी त्याला पिंपरी चिंचवड येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, संबंधित तरुणाची माहिती लपवल्यामुळे त्याच्यावर उपचार करणाऱ्या 40 डॉक्टर आणि 52 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना डी. व्हाय. पाटील कॉलेजमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच या रुग्णाला यशवंतराव रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

31 मार्च रोजी एका 30 वर्षीय तरुणाच्या वाहनाला अपघात झाला. मात्र, त्यावेळी त्याला पिंपरी चिंचवड येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे, हा रुग्ण दिल्लीतील निजामुद्दीन इथे पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला हजर होता ही माहिती त्याने डॉक्टरांपासून लपवून ठेवली होती. या रुग्णाचा एक अपघात झाला होता. त्यामध्ये इंटरनल ब्लिडिंग झाल्यामुळे त्याची सर्जरी करावी लागली होती. त्यानंतर दोन दिवस त्याला ताप येत होता. मात्र, दुसऱ्या दिवशी या रुग्णाचा वैद्यकीय अहवालात तो कोरोनाबाधीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे 40 डॉक्टर आणि 50 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्रात आतापर्यंत 700 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. यातच पुणे येथे 92 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आल्याने शहरात भितीजनक वातवरण निर्माण झाली आहे. हे देखील वाचा- COVID 19: डोंबिवली मधील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची विषाणूवर मात; कस्तुरबा रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

एएनआयचे ट्वीट-

डॉक्टरांनी या रुग्णाच्या काही चाचणी केल्यानंतर शनिवारी त्याचा वैद्यकीय अहवाल आला. या अहवालामध्ये तो कोरोनाबाधित असल्याचे समजल्यानंतर त्याच्यावर सर्जरी करणाऱ्यासह इतर डॉक्टरांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे. या 42 डॉक्टर आणि 50 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या थुंकीचे आणि काही ब्लड सॅपल्स तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला डॉक्टरांनी या रुग्णाच्या कुटुंबियांना आणि रुग्णाला ट्रॅव्हल हिस्ट्री विचारली असता त्यांनी नकार दिला होता. त्यावेळी कोणीही बोलायला तयार नव्हते. ताप आल्यानंतर त्याच्या आईने दिल्लीला जाऊन आल्याचा खुलासा केला.