Hathras Gangrape Case: उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ 26 ऑक्टोबरला काँग्रेस देशव्यापी आंदोलन करणार
Congress flags | Representational Image | (Photo Credits: PTI)

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देशाला हादरुन सोडले होते. दरम्यान, शनिवारी सीबीआयच्या पथकाने पुन्हा एकदा पीडितीचे गावास भेट दिली व पीडित कुटुंबाची चौकशी केली व घटनास्थळाची पाहणी केली. हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाचा सध्या सीबीआयकडून तपास सुरू आहे. या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसकडून (Congress) देशव्यापी आंदोलन (Nationwide Protest) करण्यात येणार आहे. येत्या 26 ऑक्टोबर रोजी काँग्रेसचे हे आंदोलन असणार आहे. तसेच, पक्षाच्या जिल्हा मुख्यलयाच्या ठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ 31 ऑक्टोबर रोजी आंदोलन केले जाणार असल्याची देखील माहिती, काँग्रेस सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे.

दरम्यान, सोनिया गांधी यांनी मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेल्या तीन कृषी कायद्यांवरून देखील टीका केली आहे. यासंदर्भात ते म्हणाले की, ही विधेयके शेतकऱ्यांच्या हिताची नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल, असे त्या म्हणाल्या आहेत. तसेच देशातील अर्थव्यवस्थेच्या बिघडलेल्या स्थितीवरून देखील त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. हे देखील वाचा- Sonia Gandhi Criticizes BJP: भाजप सरकार मुलींना सुरक्षा देण्याऐवजी गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे- सोनिया गांधी

ट्वीट-

देशासाठी सतत संघर्ष करणे हे कॉंग्रेस संघटनेचे ध्येय आहे. देशाची सेवा करणे हे आमच्या संस्थेचे मुख्य केंद्र आहे. आज देशाची लोकशाही कठीण टप्प्यातून जात आहे. एवढेच नव्हेतर, देशातील पीडित कुटुंबांचा आवाज दडपला जात आहे, अशा आशयाचे ट्विट सोनिया गांधी यांनी केले आहे.